पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला Huawei Y9 Prime स्मार्टफोन भारतात लॉन्च; पहा काय आहेत फिचर्स आणि किंमत

चायनीज स्मार्टफोन कंपनी हुवावे ने आज आपला पहिला सेल्फी पॉपअप कॅमेरा स्मार्टफोन वाय9 प्राईम 2019 भारतात लॉन्च केला.

Huawei Y9 Prime (Photo Credits: IANS)

चायनीज स्मार्टफोन कंपनी हुवावे (Huawei) ने आज आपला पहिला सेल्फी पॉपअप कॅमेरा स्मार्टफोन वाय9 प्राईम 2019 (Huawei Y9 Prime 2019) भारतात लॉन्च केला. भारतात या स्मार्टफोनची किंमत 15,990 रुपये आहे. हुवावे इंडिया कंज्युमर बिजनेस ग्रुपचे कंट्री मॅनेजर टोरोंडो पॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कंपनीचा पहिला पॉप अप सेल्फी कॅमेरा (Pop-up Selfie Camera)असलेला स्मार्टफोन असून यात सेल्फी घेण्याचा आनंद आणि अनुभव नक्कीच वेगळा असेल. हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्सचा राजा आहे. या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या लार्ज फूल व्यू स्क्रीनमुळे हा फोन आयडिल झाला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशोसह 6.59 इंचाचा फूल-एचडी प्लस एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. तसंच यात ऑक्टा-कोर किरीन 710 प्रोसेसर आहे. तसंच यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. (आता Huawei ला वापरता येणार नाही Android अपडेट, गुगलने आणली बंदी)

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 16 एमपी चा मुख्य कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा वाईल्ड अँगल सेंसर आणि 2 एमपी डेप्थ सेंसर असलेला कॅमेरा देण्यात आला आहे. तर पॉप अप सेल्फी कॅमेरा 16 एमपीचा आहे. फोनमध्ये 4 हजार एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.  तर कनेक्टिव्हिटीसाठी 4G VoLTE, Wi-Fi, ब्ल्यू-टूथ, GPS/A-GPS आणि USB टाइप-सी पोर्ट यांसारखे पर्याय आहेत.

ऑनलाईन खरेदीवर विशेष सूट:

हा स्मार्टफोन 8 ऑगस्ट दुपारी 12 पासून अॅमेझॉनवर (Amazon) खरेदीसाठी उपलब्ध असेल. तर अॅमेझॉनचे प्राईम ग्राहक हा फोन 7 ऑगस्टपासूनच खरेदी करु शकतात. एक्सचेंज ऑफरअंतर्गत 1500 रुपयांची सवलत दिली जाईल. तर SBI च्या कार्डवर 10% इंस्टंट डिस्काउंट मिळेल. अॅमेझॉन पे द्वारे खरेदी केल्यास 500 रुपयांची सवलत देखील दिली जात आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनसाठी प्री बुकिंग करणाऱ्यांना Huawei Sports BT हेडफोन्स आणि तब्बल 15,600 mAh क्षमतेची पावर बँक मोफत मिळणार आहे.