Huawei ने लॉन्च केले लिपस्टिकच्या आकाराचे TWS ईअरबड्स, 14 दिवसांच्या बॅटरी लाइफसह Watch GT3
ज्यामध्ये Huawei FreeBuds Lipstick टू वायरलेस ईअरबड्स, Huawei Watch GT 3 स्मार्टवॉचसह Nova 9 स्मार्टफोनचा समावेश आहे.
Huawei ने नुकत्याच आपले काही प्रोडक्ट्स लॉन्च केले आहेत. ज्यामध्ये Huawei FreeBuds Lipstick टू वायरलेस ईअरबड्स, Huawei Watch GT 3 स्मार्टवॉचसह Nova 9 स्मार्टफोनचा समावेश आहे. सर्व प्रोडक्ट्स व्यतिरिक्त हुवाई लिपस्टिक ट्रुली वायरलेस ईअरबड्स हे अत्यंत आकर्षक दिसून येत आहेत. तर Watch GT 3 वॉच 3 सीरिज सारखे आहे. मात्र नवे वॉच ई सिम सपोर्टसह येणार आहे.
Huawei Watch GT 3 ला 42mm आणि 46mm चे दोन डायल साइज मध्ये उपलब्ध आहे. हे प्रोडक्ट्स सध्या युरोपात लॉन्च केले आहे. हुवाईने हा खुलासा केला नाही की हे प्रोडक्ट भारतासह अन्य देशात कधी लॉन्च करणार आहे.(Instagram Update: इंस्टाग्रामवर आता लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरुनही करता येणार Post)
तर Huawei FreeBuds Lipstick ची किंमत EUR 249 असू शकते. परंतु ते लिमिटेड एडिशनसह उपलब्ध असणार आहे. Huawei Watch GT 3 42mm ची किंमत GBP 209 (जवळजवळ 21,600 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर वॉच जीटी 3 46mm ची किंमत GBP 229 (जवळजवळ 23,700 रुपये) पासून सुरु होते. स्मार्टवॉचला काही वेरियंटमध्ये उपलब्ध करुन दिले गेले आहे.
हुवाई फ्रीबर्ड्स लिपस्टिक TWS ईअरबड्स हे चार्जिंग केससह दिले आहे. याचे डिझाइन Apple AirPods Pro सारखे आहे. Apple चे इअरबड्स सफेद रंगात तर हुवाईचे लाल रंगात उपलब्ध आहे. इअरबड्स हे अॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशनसह येणार आहेत. बॅटरी बद्दल कंपनीने दावा केला आहे की, डिवाइस ANC ऑफसह 22 तासांचा प्लेटाइम मिळणार आहे.