WhatsApp Messages ओपन न करता कसे वाचाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
त्यांना रिप्लाय करण्याची तुमची इच्छा नसते. तुम्ही पण जर हे मोबाईल अॅप वापरत असाल तर तुम्ही देखील हा अनुभव नक्कीच घेतला असेल.
सध्याच्या काळात फेसबुकच्या (Facebook) मालकीचे असलेले व्हॉट्सअॅप (Whatsapp) हे अत्यंत लोकप्रिय झाले आहे. झटपट चॅट करण्यासाठी व्हॉट्सअॅप अगदी सर्रास वापरले जाते. व्हॉट्सअॅपचे तब्बल 100 मिलियनहून अधिक युजर्स आहेत. या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून तुम्ही अगदी त्वरीत मेसेज पाठवू शकता. तसंच व्हॉट्स नोट्स, व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल यांसारख्या फिचर्समुळे व्हॉट्सअॅपच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडली आहे. पण कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला व्हॉट्सअॅपचे मेसेजेस ओपन करुन पाहावेसे वाटत नाहीत. त्यांना रिप्लाय करण्याची तुमची इच्छा नसते. तुम्ही पण जर हे मोबाईल अॅप वापरत असाल तर तुम्ही देखील हा अनुभव नक्कीच घेतला असेल. अशा वेळी मेसेज पाठवणाऱ्या न कळू देता मेसेज कसा वाचू शकाल? ठाऊक आहे?
सर्वात सोपी पद्धत म्हणजे नोटीफिकेशन पॅनल बाजूला स्वाईप न करता त्यावरुन मेसेज वाचणे. दुसरी पद्धत म्हणजे WhatsApp widget च्या माध्यमातून मेसेज वाचणे. यासाठी काही वेळे तुमच्या होम स्क्रिनवर प्रेस करा आणि Widgets वर क्लिक करा. स्क्रोल डाऊन करुन WhatsApp widget शोधा. त्यानंतर मेन स्क्रीनवर ड्रॅग आणि ड्रॉप करा. त्यावर तुम्हाला न वाचलेले लेटेस्ट मेसेजेस दिसतील. त्याचबरोबर मेसेज कोणी आणि किती वाजता पाठवलाय हे देखील कळेल. तसंच डिलिट केलेले मेसेजेस वाचण्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुन थर्ड-पार्टी-अॅप डाऊनलोड करु शकता. (WhatsApp Useful Tips: व्हॉट्सअॅपद्वारे English मध्ये चॅट करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये करा 'या' सेटिंग्स)
तुम्ही जर व्हॉट्सअॅप वेब वापरत असला आणि तुम्हाला मेसेज ओपन न करता वाचायचा असेल तर या सोप्या स्टेप्स फॉलो करा:
- तुमच्या कम्प्युटरमध्ये व्हॉट्सअॅप वेब ओपन करा आणि तुमच्या व्हॉट्सअॅप मोबाईल अॅपला कनेक्ट करा.
- व्हॉट्सअॅप वेब एखादा मेसेज आल्यास माऊस करसर आलेल्या मेसेजवर न्या आणि तुम्हाला संपूर्ण मेसेज दिसेल, मात्र तुम्हाला केवळ लेटेस्ट अनरिड मेसेज दिसेल.
याव्यतिरिक्त तुम्ही या पद्धतीचा देखील वापर करु शकता:
- Airplane Mode ऑन करुन मेसेज वाचा.
- Read Receipts आणि Read Messages डिसेबल करा.
- 'Unseen App' वापरा.
- 'Blue tick, last seen hider App' वापरा.
या अगदी सोप्या पद्धतीने व्हॉट्सअॅपवर सातत्याने येणाऱ्या मेसेज युजरला न कळू देता तुम्ही वाचू शकता. यामुळे समोरच्याच्या भावनाही दुखावल्या जाणार नाहीत आणि तुम्हीही निवांत राहू शकाल.