WhatsApp Payments द्वारे पैशांची देवाण घेवाण कशी कराल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

त्यामुळे अनेक ऑनलाईन पेंमेंट्स अॅप आणि मोबाईल वॉलेट्सद्वारे आपण सोशल डिस्टसिंग पाळत आर्थिक व्यवहार करु शकतो.

WhatsApp (Photo Credit: File/PTI)

कोविड-19 (Covid-19) च्या काळात ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे (Online Transaction) महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे अनेक ऑनलाईन पेंमेंट्स अॅप आणि मोबाईल वॉलेट्सद्वारे आपण सोशल डिस्टसिंग पाळत आर्थिक व्यवहार करु शकतो. आता व्हॉट्सअॅप द्वारे युजर्स देखील ऑनलाईन पेमेंट करु शकतात. व्हॉट्सअॅप पेमेंट्स (WhatsApp Payments) मध्ये युपीआय (UPI) आधारीत असलेल्या पेमेंट मेथडचा वापर केला गेला आहे. याचा वापर करुन तुम्ही युपीआय लिंक असलेल्या बँक अकाऊंट्समधून पैशांची देवाण घेवाण करु शकता. व्हॉट्सअॅप पेमेंट ऑप्शन हा अॅनरॉईड आणि आयोएस या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. परंतु, सध्या केवळ मर्यादीत युजर्स त्याचा वापर करु शकतात. आयसीआयसी (ICICI), एचडीएफसी (HDFC), अॅक्सिस (Axis) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) ग्राहक व्हॉट्सअॅपचे पेमेंट फिचरद्वारे व्यवहार करु शकतात.

व्हॉट्सअॅप पेमेंट्सचा सेटअप कसा कराल?

# व्हॉट्सअॅप ओपन करुन सेटिंग मेन्यूमध्ये जा आणि तेथील पेमेंट्स ऑप्शनवर क्लिक करा.

त्यामध्ये Add New Account वर क्लिक करा.

# त्यानंतर अटी आणि शर्थी (Terms and Conditions) वाचून अॅसेप्ट करा.

# युपीआय लिकींग प्रोसेस करण्यासाठी एसएमएस द्वारे तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करा.

# मग तुमचे युपीआय लिंक असलेलं बँक अकाऊंट सिलेक्ट करा. अकाऊंट लिंक झाल्यावर तुम्हाला स्क्रीनवर ‘UPI Setup Complete’असा मेसेज दिसेल.

व्हॉट्सअॅप द्वारे पैसे कसे पाठवाल?

# ज्या व्यक्तीला पैसे पाठवू इच्छिता त्याचे चॅट ओपन करा.

# Attachments ऑप्शन्समधून पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा.

# अमाऊंट टाईप करुन नेक्स्ट वर क्लिक करा.

# तुमचा युपीआय पीन एंटर करुन पैसे सेंड करा.

व्हॉट्सअॅप पेमेंट द्वारे पैसे कसे स्वीकाराल?

# ज्या व्यक्तीकडून पैसे स्वीकारायचे आहेत. त्याला रिक्वेस्ट पाठवा. पेमेंट स्वीकारण्यासाठी रिक्वेस्ट अॅसेप्ट करणे आवश्यक आहे.

# समोरील व्यक्तीने रिक्वेस्ट अॅस्पेट करुन पैसे पाठवल्यास तुम्हाला मेसेज येईल. अकाऊंट बॅलन्स चेक करुन तुम्ही पैसे आले की नाही हे तपासू शकता.

व्हॉट्सअॅप पेमेंट सर्व्हीस भारतात टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली आहे. सध्या देशातील फक्ट एक कोटी युजर्स या सेवेचा लाभ घेऊ शकतात. व्हॉट्सअॅप पेमेंटची सुरुवात 2018 मध्ये झाली होती. परंतु, केंद्र सरकार आणि नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया यांची परवानगी न मिळाल्यामुळे भारतात ही सेवा सुरु होऊ शकली नव्हती. मात्र आता काही बाबी अपडेट केल्यानंतर भारतात ही सेवा सुरु करण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif