Truecaller चे नवे फिचर ; असा करा कॉल रेकॉर्ड

Truecaller च्या या प्रिमियम फिचरमध्ये युजर्स आपला कॉल रेकॉर्ड करु शकतात. पण Truecaller चे हे फिचर नेमके वापरायचे कसे?

ट्रू कॉलरचे नवे फिचर (Photo Credit : Pixabay)

Truecaller अॅपचा वापर आजकाल unknown number चा पत्ता लावण्यासाठी केला जातो. पण अलिकडेच Truecaller ने अनेक नवीन फिचर्स सादर केले आहेत. Truecaller च्या या प्रिमियम फिचरमध्ये युजर्स आपला कॉल रेकॉर्ड करु शकतात. पण Truecaller चे हे फिचर नेमके वापरायचे कसे? तर जाणून घेऊया या सोप्या स्टेप्सबद्दल...

पण त्यापूर्वी तुमचे Truecaller अॅप अपडेट असायला हवे. या स्टेप्स Truecaller अॅपचे लेटेस्ट व्हर्जन 9.13.7 किंवा त्याच्या वरील व्हर्जनवर काम करते.

स्टेप 1 : अॅपवर तुमच्या आयडीने लॉग इन करा. जर तुमचे Truecaller वर अकाऊंट नसेल तर प्रथम अकाऊंट बनवा.

स्टेप 2 : Truecaller अॅपच्या होम स्क्रीनवर जा. त्यात मेन्यूवर टॅप करा. यात तुम्हाला डाव्या बाजूला Call Recordings चा ऑप्शन दिसेल. त्यावर टॅप करा.

स्टेप 3 : यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला Startचं आप्शन दिसेल. त्यावर टॅप करा. येथे तुम्हाला 14 दिवसांचे ट्रायल पॅकेज वापरण्यासाठी मिळेल. जर तुम्ही प्रिमीयम फिचरचा वापर करु इच्छित असाल तर याचे टर्म्स अॅंड कंडीशन्स फॉलो करा.

स्टेप 4 : यानंतर तुम्हाला Accept Usage Terms चे पॉप अप दिसेल. तिथे Accept बटणावर टॅप करा. त्यानंतर अॅप तुमच्याकडून स्टोरेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंगची परवानगी मागेल त्यासाठी Continue बटणावर क्लिक करा.

स्टेप 5 : आता तुमच्यासमोर Call Recording enabled पॉप अप दिसेल. तिथे View Recording Settings बटणावर टॅप करा. आता ऑडिओ रेकॉर्डिंगला Auto किंवा Manual मध्ये सिलेक्ट करा.

स्टेप 6 : Auto मोडमध्ये आपोआप कॉलचे रेकॉर्डिंग सुरु होईल. तर Manual मोडमध्ये  तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कॉल रेकॉर्ड करु शकता. तुमचे सर्व कॉल रेकॉर्ड्स फोनच्या इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह होतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now