WhatsApp वर एखाद्याने तुम्हाला ब्लॉक केलय? 'या' पद्धतीने पाठवा मेसेज

कारण आम्ही याच संदर्भात तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत.

WhatsApp (Photo Credit: File/PTI)

WhatsApp वर जर तुम्हाला एखाद्या मित्राने किंवा घरातील व्यक्तीने लहान-मोठ्या कारणावरुन ब्लॉक केल्यास तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे. कारण आम्ही याच संदर्भात तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही एखाद्याची नाराजी किंवा जी काही समस्या असेल ती सोडवू शकता. तसेच व्हॉट्सअॅपकडून युजर्ससाठी नवे नवे फिचर्स उपलब्ध करुन दिले जातात. त्यामुळे युजर्सचा चॅटिंग करण्याचा उत्साह नेहमीच वाढलेला दिसून येतो.(Privacy Policy संदर्भातील भारताच्या प्रश्नांवर WhatsApp ने दिले स्पष्टीकरण- 'पारदर्शकता आणणे हे आमचे उद्दीष्ट')

व्हॉट्सअॅपवर जर तुम्हाला ब्लॉक करण्यात आले असल्यास त्याला तुम्ही फोन करु शकता. पण व्हॉट्सअॅपच्याच मदतीने तुम्हाला ब्लॉक केलेल्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकता. यासाठी पुढील काही सोप्प्या ट्रिक्स लक्षात ठेवा.(WhatsApp मध्ये नवे फिचर रोलआउट, आता डेस्कटॉप युजर्सला मिळणार कॉलिंगची सुविधा)

-व्हॉट्सअॅपवर ज्या युजरने तुम्हाला ब्लॉक केल आहे त्यासाठी तुमच्या एखाद्या कॉमन फ्रेंड किंवा घरातील कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे.

-त्यानंतर त्या पैकी एखाद्याला WhatsApp ग्रुप तयार करण्यास सांगा. त्यावेळी स्वत:सह तुम्हाला आणि ज्याने ब्लॉक केल आहे त्याला सुद्धा ग्रुपमध्ये अॅड करण्यास सांगा.

-असे केल्यानंतर अन्य जणांना ग्रुप सोडण्यास सांगा.

- आता ग्रुपमध्ये तुम्ही आणि ब्लॉक केलेला व्यक्ती तेथे राहिल.

-अशा पद्धतीने तुम्ही ब्लॉक केलेल्या व्यक्तीला थेट मेसेज करु शकता.

तर वरील सोप्प्या पद्धतीने तुम्ही या ट्रिकचा वापर करत तुमची समस्या सोडवू शकता. दरम्यान, व्हॉट्सअॅपवर सध्या नवे फिचर Stickers Shortcut वर काम करत असल्याचे WABetainfo यांच्या रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. हे फिचर आल्यानंतर व्हॉट्सअॅपवर स्टिकर्सच्या माध्यमातून आपली गोष्ट समोरच्याला सांगता येणार आहे. व्हॉट्सअॅपचे हे फिचर चॅटबार येथे उपलब्ध करुन दिले जाणार आहे.