मोबाईल वर वाजणारी कोरोना व्हायरस खोकल्याची 'Caller Tune' बंद करण्यासाठी 'हा' पर्याय येईल कामी

मात्र हेच माध्यम आता लोकांसाठी डोकेदुखी बनली आहे. जनजागृती करण्यासाठी मोबाईल ठेवण्यात येणारी कॉलर ट्यून आता मोबाईल धारकांसाठी डोकेदुखी बनली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) जगभरात होणारा फैलाव पाहता त्या त्या देशातील प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरस संबंधी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी सोशल मिडिया, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून त्या संबंधीची संदेश दिले जात आहे. त्याचबरोबर 24 तास सतत सर्वांच्या सोबत असलेला मोबाईल हे देखील प्रशासनाने कोरोना संबंधी जनजागृती करण्याचे माध्यम शोधले आहे. मात्र हेच माध्यम आता लोकांसाठी डोकेदुखी बनली आहे. जनजागृती करण्यासाठी मोबाईल ठेवण्यात येणारी कॉलर ट्यून आता मोबाईल धारकांसाठी डोकेदुखी बनली आहे.

एखाद्याला मोबाईलवर कॉल केल्यानंतर पहिल्या कोरोना संबंधीची जनजागृती संबंधीचा 30 सेकंदाचा संदेश येतो, ज्याची सुरुवात अत्यंत वाईट पद्धतीने खोकल्याने होते. हा खोकला कानाला इतका त्रासदायक झालाय लोकांना कुणाला फोन करणे सुद्धा जीवावर येऊ लागलय. अशा खोकल्यापासून थोडक्यात या संदेशापासून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी तुम्ही पुढे दिलेला पर्याय वापरु शकाल. Coronavirus In India: भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 73; 56 भारतीय तर 17 परदेशी Covid-19 बाधित

1. तुम्हाला ज्याला कॉल करायचाय त्याचा नंबर डायल करा.

2. त्यानंतर तो 30 सेकंदाचा संदेश सुरु होण्याची वाट पाहा

3. खोकल्याचा आवाज येताच 1 नंबर दाबा

4. त्यानंतर आपोआप तो संदेश स्किप होऊन नॉर्मल रिंगटोन वाजेल.

5. जर तुम्ही आयफोन युजर्स असला तर # बटन दाबा

6. एकदा बटण दाबूनही जर बटण संदेश बंद झाला नसेल तर पुन्हा एकदा # दाबा. याला कारण म्हणजे पहिल्यांदा # दाबल्यानंतर अनेकदा संबंधित टेलिकॉम प्रोवायटर ते Accept करत नाही अशा वेळी पुन्हा दाबल्यास तो संदेश बंद होईल.

CoronaVirus : भारतात कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची परिस्थिति आता स्थिर : Watch Video

याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रशासनाने सुरु केलेला हा संदेश ऐकू नका. मात्र

आपत्कालीन स्थितीमध्ये तात्काळ फोन लावायचा असल्यास तुम्ही वर दिलेल्या पद्धतीने ही ३० सेकंदाची कॉलर ट्यून ऐकणे टाळू शकता.