IPL Auction 2025 Live

WhatsApp Tips and Tricks: हेडफोनशिवाय 'या' गुप्त पद्धतीने WhatsApp वरील मेसेज ऐकू शकता, जाणून घ्या अधिक

WhatsApp (Photo Credits: WhatsApp)

WhatsApp Tips and Tricks: आपण जेव्हा एखाद्या महत्वाच्या मिटींमध्ये असतो आणि अशाच वेळी आपल्याला कोणाचा तरी WhatsApp Voice मेसेज येतो. मात्र तेव्हा जर तुम्ही तो वॉईस मेसेज वाचण्यासाठी क्लिक केल्यास तो मीटिंमधील सर्वांना ऐकवला जाऊ शकतो. यामुळे सर्वांचे लक्ष तुमच्याकडे जाते. पण ही गोष्ट लाजिरवाणी असून तुम्ही निष्काळजीपणे असल्याचे दर्शवले जाते. परंतु तुम्ही व्हॉट्सअॅपच्या या एका फिचरच्या माध्यमातून ही स्थिती टाळू शकता.(WhatsApp OTP Scam काय आहे? त्यापासून सुरक्षित कसे राहाल?)

व्हॉट्सअॅपवर कोणत्याही खास नावाने या संदर्भातील फिचर नाही आहे. त्याचसोबत हे फिचर मिळवण्यासाठी व्हॉट्सअॅप सुद्धा अपडेट करावे लागणार नाही आहे. मात्र वॉईस मेसेज एकण्याची एक सीक्रेट पद्धत असून ती फक्त ऑडिओ फाइल्ससाठीच असणार आहे.(Whatsapp मध्ये लवकरचं येणार 'हे' खास फिचर्स; जाणून घ्या)

>>'या' पद्धतीने करा वापर

-WhatsApp वरील Voice Message ऐकण्यासाठी तुम्ही Play बटणवर क्लिक करा. त्यानंतर फोन तुमच्या कानाला लावा.

-या पद्धतीने तुम्ही ऑडिओ फाईल्स स्पीकर वर

ठेवून ऐकण्याऐवजी इअरपीसच्या माध्यमातून ऐकू शकता.

दरम्यान, व्हॉट्सअॅप युजर्स त्यांच्या व्हॉट्सअॅपवरील ऑडिओ क्लिपचा वापर वॉकी टॉकी सारखा ही करु शकतात. त्यामुळे एखाद्याशी बोलायचे झाल्यास टायपिंग किंवा कॉलिंग ऐवजी शॉर्ट ऑडिओ क्लिपचा वापर करु शकतात.