How To Make Group Call on Telegram: टेलिग्राम अॅपवर वर ग्रुप व्हिडिओ कॉल कसा कराल?
Telegram या इन्स्टंट कॉलिंगमध्ये (Instant Video Calling) देखील काही बदल करण्यात आले. त्यामुळे त्याच्या माध्यमातून देखील ग्रुप कॉलिंग अगदी सहजसोपे झाले असेल. मात्र आपल्यापैकी अनेकांना हे ग्रुप कॉलिंग कसे करायचे आणि मोबाईलमध्ये काय सेटिंग करायची हे माहिती असणे गरजेचे आहे.
आपल्यापासून कोसो दूर असलेल्या लोकांशी बोलता यावे, त्यांना पाहता यावा म्हणून सोशल मिडियाने अनेक नवनेव फिचर्स, अॅप्स आणले. त्यात लॉकडाऊन दरम्यान तर एकमेकांना भेटणं अवघड असताना Zoom, Skype, Google Meet सारखे अनेक अॅप्स नवीन बदलासह आपल्यासमोर आणण्यात आले. त्यामुळे ग्रुप कॉलिंग, ग्रुप व्हिडिओ कॉलिंग देखील अगदी सहजशक्य झाले. त्याचप्रमाणे Telegram या इन्स्टंट कॉलिंगमध्ये (Instant Video Calling) देखील काही बदल करण्यात आले. त्यामुळे त्याच्या माध्यमातून देखील ग्रुप कॉलिंग अगदी सहजसोपे झाले असेल. मात्र आपल्यापैकी अनेकांना हे ग्रुप कॉलिंग कसे करायचे आणि मोबाईलमध्ये काय सेटिंग करायची हे माहिती असणे गरजेचे आहे.
टेलिग्रामच्या बीटा व्हर्जनमध्ये हे नवीन फिचर रोलआउट केले गेले आहे. याचा अर्थ आता ग्रुप कॉल फीचर केवळ बीटा यूजर्सच वापरु शकतात. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये Telegram चे लेटेस्ट बीटा व्हर्जन असले पाहिजे.हेदेखील वाचा- Instagram वर फॉलोअर्स वाढवायचेत? मग जाणून घ्या 'या' सोप्या आणि महत्वाच्या टिप्स
टेलिग्राम कसे कराल ग्रुप व्हिडिओ कॉल?
1. आपल्या स्मार्टफोनवर टेलिग्राम अॅप ओपन करा.
2. कोणत्याही ग्रुप चॅट विंडोवर जा आणि त्याच्या हेडरवर टॅप करा
3. येथे तुम्हाला ग्रुप मेंबर्स आणि नोटिफिकेशन सेटिंग्ससह ग्रुपशी संबंधित अन्य माहिती मिळेल
4. त्यानंतर वरच्या उजवीकडील कोप-यात ... या चिन्हावर टॅप करा. आणि स्टार्ट व्हॉईस चॅट पर्यायावर क्लिक करा.
5. आता तुम्हाला एक नवीन पॉप-अप विंडो दिसेल. जेथे आपण त्या मेंबर्सला सिलेक्ट करु शकता, ज्यांना तुम्ही आपल्या ग्रुप कॉलमध्ये जोडू इच्छिता.
त्याचबरोबर टेलिग्रामच्या या ग्रुप कॉल फीचरमध्ये 'Only admins can talk’ नावाची सुविधा मिळेल. या बॉक्सवर टिक केल्यानंतर केवळ कॉल करणाराच बोलू शकेल आणि इतर मेंबर्स केवळ ऐकतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)