WhatsApp Chats जुन्या मोबाईलमधून नवीन फोनमध्ये आणण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्प्या स्टेप्स
त्यासाठी फॉलो करा पुढे दिलेल्या टिप्स:
WhatsApp हे सोशल मिडियाचे माध्यम जणू प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे असे म्हणायला हरकत नाही. व्हॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातून आपल्या मित्रपरिवाराशी, नातलगांशी आपणे जोडलेले राहतो. त्यामुळे ते सर्व चॅट आपल्यासाठी खूप खास असतात. मात्र जर आपण नवीन मोबाईल घेतला असाल तर हे व्हॉट्सअॅप चॅट (WhatsApp Chats) अनेकदा नवीन मोबाईल मध्ये येत नाही. अशा वेळी आपली अनेकदा निराशा होते. यासाठी प्रत्येकाला हे नवीन मोबाईल मध्येही यावे अशी इच्छा असते. अशा वेळी तुम्ही ठराविक फॉलो केल्यात तर ही गोष्ट तुम्ही अगदी सहजसोप्या पद्धतीने तुमच्या नवीन मोबाईलमध्ये घेऊ शकता.
व्हॉट्सअॅप चॅट नवीन मोबाईल मध्ये येण्यासाठी काही ठराविक गोष्टी तुम्हाला सेटिंग्समध्ये जाऊन बदलाव्या लागतात. त्यासाठी फॉलो करा पुढे दिलेल्या टिप्स:
1. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जुन्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप उघडावे लागेल. त्यानंतर उजव्या बाजूला वरच्या कोप-यात 3 डॉट्स दिसतील. त्यावर क्लिक करा.
हेदेखील वाचा- WhatsApp वरील मेसेज चुकून डिलिट झालाय? 'या' पद्धतीने पुन्हा मिळवता येणार
2. त्यानंतर Settings मध्ये जा आणि Chats वर क्लिक करा.
3. त्यानंतर Chats backup मध्ये टॅप करा.
4. मग चॅट्स बॅकअप करण्यासाठी मॅन्युअली वा ऑटोमॅटिकली (weekly, monthly etc) पर्याय निवडू शकता.
5. त्यानंतर जेव्हा तुम्ही नवा मोबाईल सुरु करता तेव्हा त्यात आधी WhatsApp इन्स्टॉल करा. त्यानंतर गुगल ड्राईव मधून जुने चॅट्स आणि मिडिया रिकव्हर करण्यासाठी विचारले जाईल.
या पद्धतीने तुम्हाला तुमचा WhatsApp Chats बॅकअप मिळेल. ही पद्धत अॅनड्राईड मोबाईलसाठी आहे. आयफोन धारकांनी Apple ID मध्ये जाऊन iCloud सुरु करा. त्यानंतर अॅनड्रॉईडच्या वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.