IPL Auction 2025 Live

Happy New Year 2021 Wishes And Messages: नववर्ष 2021 च्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Stickers, GIFs कसे डाऊनलोड कराल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

मात्र व्हॉट्सअॅप वरुन नेहमीचेच तेच तेच मेसेसेज न पाठवता किंवा आलेले मेसेज फॉरवर्ड न करता काही वेगळ्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असल्यास स्टिकर्स, GIFs, Emojis पर्याय तुमच्याकडे आहे.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

2020 हे वर्ष अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आणि गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांनाच लक्षात राहील असे आहे. कोरोना व्हायरस संकट आणि त्याच्या सोबतीने आलेल्या अनेक अडचणी, समस्यांवर मात करत करत आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अवघ्या दोन दिवसांत आपण 2020 ला निरोप देऊ आणि 2021 मध्ये पर्दापण करु. दरम्यान, 2020 च्या संकटमय प्रवासानंतर नववर्ष स्वागताचा उत्साह सर्वांमध्ये आहे. नववर्षानिमित्त नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट यांना शुभेच्छा दिल्या जातील आणि शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्स्अॅप (WhatsApp) हे माध्यम अगदी सर्रास वापरले जाते.

मात्र व्हॉट्सअॅप वरुन नेहमीचेच तेच तेच मेसेसेज न पाठवता किंवा आलेले मेसेज फॉरवर्ड न करता काही वेगळ्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असल्यास स्टिकर्स, GIFs, Emojis पर्याय तुमच्याकडे आहे. परंतु, त्याचा वापर नेमका कसा करायचा? तर जाणून घेऊया WhatsApp Stickers, GIFs डाऊनलोड आणि सेंड कसे कराल? (WhatsApp लवकरच सादर करणार multi-device support हे नवे फिचर; पहा काय आहे खासियत)

# गुगल प्ले स्टोअरवर जा आणि 'New Year 2021 Stickers for WhatsApp' असे टाईप करा.

# त्यानंतर अनेक पर्याय तुम्हाला स्क्रिनवर दिसतील. त्यापैकी तुमच्या आवडीचा पर्याय निवडा. 'Happy New Year 2021 Stickers' अॅप्स इंस्टॉल करणे अधिक सोईस्कर ठरेल.

Happy New Year 2021 Stickers (Photo Credits: Google Play Store)

# डाऊनलोड केलेले अॅप ओपन केल्यावर तुम्हाला New Year 2021 चे सहा स्टिकर्स पॅक्स दिसतील.

# ते सर्व स्टिकर्स पॅक्स तुम्ही ओपन करुन पाहू शकता. तुमच्या व्हॉट्सअॅप वर हे स्टिकर्स अॅड करण्यासाठी 'Add to WhatsApp' वर क्लिक करा. त्यासाठी स्टिकरच्या उजव्या बाजूला असणाऱ्या '+' आयकॉनवर क्लिक करा.

Happy New Year 2021 Stickers (Photo Credits: Google Play Store)

# सिलेक्डेट स्टिकर व्हॉट्सअॅपवर अॅड करायचा की नाही यासाठी तुम्हाला एक एक कर्न्फर्मेशन मेसेज विचारण्यात येईल. त्यानंतर Yes वर क्लिक केल्यावर सर्व सिलेक्टेड स्टिकर्स व्हॉट्सअॅपवर अॅड होतील.

# स्टिकर्स अॅड झाले की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तीला हे स्टिकर्स पाठवायचे आहेत त्याच्या व्हॉट्सअअॅप चॅट ओपन करा. स्माईली आयकॉनवर क्लिक करा आणि स्टिकर्स सेक्शनवर जा.

# तुम्हाला सर्व अॅड केलेले स्टिकर्स दिसतील. तुमच्या आवडीचा स्टिकर तुम्ही शेअर करु शकता.

# GIFs पाठवण्यासाठी Giphy.com वर जा आणि नववर्षाचे GIFs सर्च करा.

Happy New Year GIFs (Photo Credits: Giphy)

# तुमच्या आवडीचा GIF पाठवण्साठी त्यावर क्लिक करुन ओपन करा. 'Copy Link' वर क्लिक करा आणि 'HTML5 Video' वर क्लिक करा.

Happy New Year GIFs (Photo Credits: Giphy)

# त्यानंतर व्हॉट्सअॅपवर जा आणि तुमच्या ज्या व्यक्तीला GIF पाठवणायचं आहे त्या व्यक्तीच्या चॅटबॉक्स मध्ये व्हिडिओ लिंक पेस्ट करा.

# Send वर क्लिक करुन त्या व्यक्तीसोबत शेअर करा.

नववर्षच्या शुभेच्छा देण्याच्या हा सर्वात हटके मार्ग तुमच्याकडे उपलब्ध आहे. तसंच सध्या कोरोना संकटकाळात नववर्षानिमित्त प्रियजनांच्या भेटी घेणे शक्य होईलच असे नाही. त्यामुळे व्हर्च्युअल माध्यमातून शुभेच्छा तुम्ही नक्कीच देऊ शकता.