सुरक्षित पद्धतीने Net Banking च्या माध्यमातून कामे करण्यासाठी 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा
त्यामुळे बहुतांश लोक बँक ट्राजॅक्शन ऑनलाईन पद्धतीने करत आहेत. तसेच सध्याच्या काळात बँकेची कामे जसे एखाद्याला पैसे पाठवणे किंवा एलआयसीचा हफ्तासह अन्य पैशांसंबंधित कामे नेट बँकिंगच्या माध्यमातून केली जात आहेत.
सध्या देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे बहुतांश लोक बँक ट्राजॅक्शन ऑनलाईन पद्धतीने करत आहेत. तसेच सध्याच्या काळात बँकेची कामे जसे एखाद्याला पैसे पाठवणे किंवा एलआयसीचा हफ्तासह अन्य पैशांसंबंधित कामे नेट बँकिंगच्या माध्यमातून केली जात आहेत. बँक मधील होणारी गर्दी पाहता नेट बँकिंग उत्तम पर्याय आहे. परंतु इंटरनेट बँकिंगचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे. तर आम्ही तुम्हाला नेट बँकिंग संबंधित काही महत्वाच्या टीप्स सांगणार आहोत. तुम्हाला जर एखादा मेजेस किंवा ईमेल आल्यास त्यामध्ये दिलेली लिंक सुरु करु नका. कारण नेहमीच लक्षात ठेवा की ब्राउजरच्या अॅड्रेस बारमध्ये जॅक URL टाइप करुन लॉगिन करण्याच्या वेळी तेथए http:// आणि लॉक आयकॉन पहा. कारण बँकेची वेबसाईट यासोबतच येते.
लायब्रेरी, सायबर कॅफे किंवा ऑफिस सारख्या सार्वजनिक ठिकाणी नेट बँकिंग करण्यापासून सावध रहा. कारण ते कंप्युटर्स विविध युजर्सकडून वापरले जात असून पासवर्ड चोरी होण्याची अधिक शक्यता असते. तरीसुद्धा तुम्ही या सिस्टिमवर लॉगिन करत असल्यास कंप्युटरमधून पैसे, ब्राउजर हिस्ट्री डिलिट करण्यास विसरु नका. तसेच ब्राउजरमध्ये Remember ID and Password वर क्लिक कधीच करु नका. त्याचसोबत ईमेल किंवा फोनच्या माध्यमातून जर तुम्हाला इंटरनेट बँकिंग युजरनेम, पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक, CVV,OTP कोणालाच सांगू नये. (Facebook चे नवे फिचर रोलआउट, एकाच वेळी 50 जणांसोबत व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून संवाद साधता येणार)
ऑनलाईन पद्धतीने व्यवहार केल्यानंतर जर तुम्ही बचत खात्यामधील रक्कम तपासून पाहत असताना तेथे काही गोंधळ वाटत असल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा. बँकेचा हेल्पलाईन क्रमांक आणि तुमचा खाते क्रमांक नेहमीच आपल्याजवळ ठेवावा. असे केल्यास आपत्कालीन काळात तुम्ही नेट बँकिंग लगेच ब्लॉक करु शकता. बँक खात्याच्या सुरक्षितेतसाठी नेहमी वेळोवेळी पासवर्डमध्ये बदल करावा. प्रत्येक वेळी एक Unique Password ठेवावा आणि तो कोणासोबत सुद्धा शेअर करु नये. तसेच नेट बँकिंग केल्यानंतर लॉगआउट करणे विसरु नका.