Instagram अकाऊंट Permanently Delete कसे कराल? फॉलो करा या सोप्या '5' स्टेप्स

फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्रामच्या माध्यमातून मित्रपरीवाराशी कनेक्टेड राहणे, सेलिब्रिटींना फॉलो करणे सहज सोपे आहे.

Instagram (Photo Credits: Instagram)

How to Delet Instagram Account Permanently: इंस्टाग्राम (Instagram), फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) यांसारखी सोशल मीडिया माध्यमांचे अनेक फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्रामच्या माध्यमातून मित्रपरीवाराशी कनेक्टेड राहणे, सेलिब्रिटींना फॉलो करणे सहज सोपे आहे. फोटोज, व्हिडिओज शेअर करुन तुम्ही तुमचेही फॉलोअर्स वाढवू शकता. सध्या इंस्टाग्रामचे 1 बिलियन युजर्स आहेत. परंतु, काही वेळेस या सोशली कन्टेडेट राहणे, अॅक्टीव्ह राहणे त्रासदायक किंवा कंटाळवाणे होऊ शकते. अशा वेळेस तुमची अकाऊंट डिलिट करण्याची इच्छा होते. तर कधी काही काळासाठी यापासून दूर जावेसे वाटते. असे वाटल्यास तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाऊंट काही काळासाठी डिसेबल करु शकता किंवा अगदी कायमस्वरुपी देखील डिलिट करु शकता. अकाऊंट कायमस्वरुपी डिलिट (Permanently Delete) केल्याने तुमचे सर्व फोटोज, व्हिडिओज, अकाऊंट हिस्ट्री, फॉलोअर्स, लाईक्स आणि कमेंट्स देखील डिलिट होतील. अवघ्या 5 सोप्या स्टेप्सद्वारे तुम्ही इंस्टाग्राम अकाऊंट कायमस्वरुपी डिलिट करु शकता. (How to Repost a Story on Instagram: इंस्टाग्रामवर स्टोरी रिपोस्ट कशी कराल? फॉलो करा '6' सोप्या स्टेप्स)

इंस्टाग्राम अकाऊंट कायमस्वरुपी डिलिट करण्याच्या स्टेप्स:

1. Instagram.com द्वारे तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटला भेट द्या. इंस्टाग्राम अॅपवरुन तुम्ही तुमचे अकाऊंट डिलिट करु शकत नाही.

Instagram (Photo Credits: Instagram)

2. Delete Your Account' पेजवर जा.

3. या पेजवरील ड्रॉप डाऊन मेन्यूमधील 'Why are you deleting your account?' वर जा.

Instagram (Photo Credits: Instagram)

4. या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंर इंस्टाग्रामचा पासवर्ड पुन्हा इंटर करा.

Instagram (Photo Credits: Instagram)

5. त्यानंतर 'Permanently delete my account' वर क्लिक करा.

तुम्हाला जर तुमचे इंस्टाग्राम अकाऊंट कायमस्वरुपी डिलिट करायचे नसेल तर 'Temporarily disable my account' हा पर्यायही तिथे उपलब्ध आहे. हा पर्याय निवडल्यास तुम्ही काही काळासाठी तुमचे अकाऊंट डिसेबल करु सकता. यामुळे तुमचे सर्व फोटोज, व्हिडिओज, लाईक्स आणि कमेंट्स तुम्ही अकाऊंट रि-अॅक्टीव्हेट करेपर्यंत हाईड होतील.