IPL Auction 2025 Live

तुमचा फोन रेकॉर्ड केला जातोय? 'या' पद्धतीने तपासून पहा

मात्र काही वेळेस फोन सुरु असताना तुम्हाला समोरचा व्यक्ती फोन रेकॉर्ड करत असल्याचे कळून येत नाही. भारतासह अन्य काही देशांमध्ये परवानगी शिवाय कॉल रेकॉर्ड करणे कायदेशीर नाही आहे.

Image For Representation (Photo Credits-Facebook)

जर एखादा व्यक्ती तुम्हाला न विचारता कॉल रेकॉर्ड करत असल्यास ही गोष्ट फार चुकीचे आहे. मात्र काही वेळेस फोन सुरु असताना तुम्हाला समोरचा व्यक्ती फोन रेकॉर्ड करत असल्याचे कळून येत नाही. भारतासह अन्य काही देशांमध्ये परवानगी शिवाय कॉल रेकॉर्ड करणे कायदेशीर नाही आहे. परंतु जर तुम्हाला तुमचा फोन रेकॉर्ड असल्याचे माहिती करुन घ्यायचे असल्यास त्याबाबत तुम्ही सहज तपासून पाहू शकतात. तर एखाद्या शासकीय कंपनीकडून तुम्हाला फोन आल्यास ते तुमचा फोन कधीच रेकॉर्ड करत नाहीत.सरकारी कंपन्या खरंतर टेलिकॉम कंपन्यांच्या आधारे कॉल रेकॉर्ड करतात. त्यामुळे तुम्हा कळून येत नाही की तुमचा फोन रेकॉर्ड केला जात आहे. तर जाणून घ्या जर एखाद्याकडून तुमचा फोन रेकॉर्ड केला जात असल्यास तो कशा पद्धतीने तपासून पहाल.

- जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा फोन आल्यास काही मिनिटांनी तुम्हाला बीप असा आवाज आल्यास तर समजून घ्या समोरचा व्यक्ती तुमचा फोन रेकॉर्ड करत आहे.

-तुम्ही फोनवर बोलत असल्यास फोन ओव्हरहिटिंग करत असल्याची घटना वारंवार होत असल्यास तर जपून रहा. कारण स्मार्टफोनमध्ये एका सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले असून ते कॉल रेकॉर्डिंग दुसरीकडे पाठवते. त्यामुळे वारंवार कॉल रेकॉर्ड केल्याने किंवा पाठवल्याने ओव्हर हिटिंगची समस्या उद्भवते.

-जर तुम्ही फोनचा वापर करत नाही आहात. अशावेळी तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येऊन ही तुम्ही पाहिले नाही. तसेच सायलेन्ट मोड आपणहून ऑफ झाल्यास किंवा फ्रंट कॅमेरा अचानक सुरु झाल्यास तर समजून घ्या तुमच्या फोनवर कोणतरी पाळत ठेवत आहे.(सरकार फ्री कॉलिंग आणि डेटा सर्विस बंद करण्याची शक्यता)

 एवढेच नाही तर तुम्हाला मोबाईलवर विचित्र मेसेज, चिन्ह किंवा काही एखादा टेक्स आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. अशा पद्धतीमुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये काही व्यतय येत असल्यास फोनचा बॅकअप घेऊन फॅक्ट्री रिसेट करा.त्याचसोबत स्मार्टफोनच्या वरील बाजूस असलेल्या पॅनलवर कोणत्याही कारणास्तव माइक आयकॉन दिसल्यास तर तुमचा फोन रेकॉर्ड केला जात असल्याचे तुम्हाला कळून येईल.