Your Time on Facebook फीचर ठेवणार तुमच्या फेसबुकवरील टाईमपासवर लक्ष !

फेसबुक प्रमाणे काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर तुमचं टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी हे फिचर देण्यात आलं.

Your Time on Facebook फीचर (Photo Credits: Twitter)

इंस्टाग्रामप्रमाणे आता फेसबुकवरही तुम्ही किती वेळ घालवता यासाठी फेसबुककडूनच Your Time on Facebook Feature खास पर्याय दिला जाणार आहे. यापर्यायाद्वारा तुम्हांला सोशल मीडियावर तुमचं टाइम मॅनेजमेंट करणं सोप्प होणार आहे. सोशल मीडियाचा अतिवापर केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील त्रासदायक आहे. त्यामुळे त्याच्या आहारी जाण्याआधीच स्वतःला सांभाळणं गरजेचे आहे. यासाठी खुद्द फेसबुक कंपनीने पुढाकार घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात घोषणा केल्याप्रमाणे आता हे फिचर लॉन्च करण्यासाठी सज्ज झाले आहे.

कुठे पहाल हे Your Time on Facebook Feature ?

तुमच्या सोयोनुसार तुम्ही वेळमर्यादा सेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळतात. फेसबुक कडून मिळणारी नोटिफिकेशन्स तुम्ही म्यूट (MUTE ) देखील करू शकता. फेसबुक प्रमाणे काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर हे फिचर देण्यात आलं होतं. Instagram Update : इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर  फेसबुकच्या आहारी जाणारी तरुणाई ही आज जगभर चिंतेचा विषय बनत होती. यावरून अनेकदा फेसबुकवरही टीका करण्यात आली होती.