How to Change Whatsapp Language: आपल्या स्मार्टफोन डिव्हाइसवर GBoard Keyboard द्वारे व्हॉट्सअॅपची भाषा कशी बदलू शकतात? येथे पाहा
जगभरात व्हॉट्सअॅप 40 हून अधिक भाषांमध्ये आणि 60 पर्यंत भाषांमध्ये Android वर उपलब्ध आहे. आपण GBoard वापरुन व्हॉट्सअॅप भाषा बदलू शकता. इथे 'हे' सोप्पे पर्याय पाहून आपण GBoard डाउनलोड करून आपल्या स्थानिक भाषेत व्हॉट्सअॅपवर चॅट करू शकतात. व्हॉट्सअॅप भाषा कशी बदलावी येथे पाहा...
How to Change Whatsapp Language: ऑनलाईन मेसेजच्या माध्यमातून मित्रांशी गप्पा मारणे आणि संपर्क साधणे आवश्यक असताना व्हॉट्सअॅप (Whatsapp) हे एक अनिवार्य अॅप बनले आहे. हे विनामूल्य सोशल मीडिया मेसेंजर अॅप यूजर्सना स्टोरीज, व्हिडिओ, मल्टीमीडिया, एपीके फाइल्स, डोकमेंट्स, व्हॉइस नोट्स, व्हिडिओ कॉल आणि बरेच काही अपलोड करण्याची येथे सोय उपलब्ध आहे. जगभरात व्हॉट्सअॅप (Whatsapp Languages) 40 हून अधिक भाषांमध्ये आणि 60 पर्यंत भाषांमध्ये Android वर उपलब्ध आहे. परंतु सामान्य नियम म्हणून, तो आपल्या फोनची भाषा फॉलो करतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या फोनची भाषा मराठी बदलली तर व्हॉट्सअॅप आपोआपच मराठीत येईल. दरम्यान, व्हॉट्सअॅप भारतात (Whatsapp India) एकूण 11 स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. पण, आपल्या फोनची भाषा इंग्लिश असेल, पण जर आपल्याला इंग्रजी येत नसेल तर ही सेटिंग करा आणि व्हॉट्सअॅपवर इंग्रजीमध्ये चॅट करा. (आता WhatsApp च्या माध्यमातून Transfer करू शकाल पैसे; NPCI ने दिली परवानगी)
आपण GBoard वापरुन व्हॉट्सअॅप भाषा बदलू शकता. इथे 'हे' सोप्पे पर्याय पाहून आपण GBoard डाउनलोड करून आपल्या स्थानिक भाषेत व्हॉट्सअॅपवर चॅट करू शकतात. व्हॉट्सअॅप भाषा कशी बदलावी येथे पाहा...
1. गूगल प्ले-स्टोरवरून Gboard अॅप डाउनलोड करा
2. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईल मेनूमध्ये किंवा Home Page वर Gboard अॅप चिन्ह दिसेल.
3. त्यांनतर ट्रान्सलेट अॅप ओपन करून जी काही परवानगी ते मागतील ती द्या.
4. त्यांनतर व्हॉट्सअॅप चॅट ओपन करा.
5. तिथे Google चं बटन असेल ज्याच्यावर क्लीक केल्यावर Google Translate चा ऑप्शन दिसेल.
6. त्यानंतर आपली पहिली भाषा निवडा आणि दुसरी भाषा इंग्लिश निवडा व मराठी ते इंग्रजी भाषेत व्हॉट्सअॅपवर चॅट करा.
फेसबुकच्या मालकीचे व्हॉट्सअॅपचे 180 देशांमध्ये 1 अब्जाहून हून यूजर्स आहेत. हे अॅप आपल्याला कॉल, संदेश, डोकमेंट्स, फोटो, GIF आणि व्हिडिओ एक ग्रुप किंवा एका व्यक्तीला कधीही आणि कोठूनही पाठवू व प्राप्त करू शकतात. व्हॉट्सअॅप विनामूल्य आहे आणि जगभरातील फोनवर सोपी, सुरक्षित, विश्वासार्ह मेसेजिंग आणि कॉलिंगसाठी उपलब्ध आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)