OnePlus 7 Pro चे फिचर्स अचूक ओळखा आणि जिंका हा स्मार्टफोन; स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फॉलो करा 'या' स्टेप्स

या स्मार्टफोनच्या प्रमोशनसाठी कंपनीने एक खास ऑफर सादर केली आहे.

OnePlus 7 Pro (Photo Credits: File Photo)

OnePlus 7 Pro हा स्मार्टफोन भारतात 14 मे रोजी लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनच्या प्रमोशनसाठी कंपनीने एक खास ऑफर सादर केली आहे. कंपनीने या फोनचा आराखडा सोशल मीडियावर शेअर करुन फिचर्स ओळखण्यास सुचवले आहे आणि अचूक फिचर्स ओळखणाऱ्यांना कंपनी हा स्मार्टफोन फ्री मध्ये देणार आहे. (OnePlus 7Pro वनप्लस 7प्रो मध्ये असणार ‘HDR 10 Plus’ डिस्प्ले)

फिचर्स बद्दलचे तुमचे अंदाज तुम्ही @oneplus_in या ट्विटर आयडीवर 8 मे रात्री 11:59 वाजेपर्यंत पाठवू शकता. तुमचे अंदाज खरे ठरल्यास तुम्ही जिंकू शकाल वनप्लस 7 प्रो. तसंच इतरही बक्षीस दिली जाणार आहेत. ट्विटरशिवाय इंस्टाग्राम, फेसबुक द्वारेही तुम्ही या स्पर्धेत सहभाग घेऊ शकता.

OnePlus India ट्विट:

OnePlus 7 Pro च्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी:

# या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे स्पर्धक OnePlus 7 Pro च्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवरुन आपला सहभाग नोंदवू शकता.

# स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमचे फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंट पब्लिक असणे गरजेचे आहे.

# वेळेची मर्यादा लक्षात घेऊन त्यापूर्वी तुमचे उत्तर पाठवा.

कंपनीने वनप्लस 7 प्रो स्मार्टफोनची प्री बुकिंग अ‍ॅमेझॉन इंडिया वर  सुरु झाली आहे.