New Rule For Social Media: वापरा नाहीतर विसरा! सरकारने 'फेसबूक' आणि 'इंस्टाग्राम'बाबत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; कारणही घ्या जाणून

या नवीन नियमानुसार युजर्सचा डेटादेखील मिळेल.

Instagram, Facebook (PC - Pixabay)

सोशल मीडियावर (Social Media) अनेक लोक एकपेक्षा जास्त अकाउंट बनवतात. त्यामुळे डेटा गोळा करताना खूप प्रॉब्लेम येतात. त्यामुळेच सोशल मीडिया युजर्ससाठी (Social Media Users) सरकारने एक नवीन नियम तयार केला आहे. ज्यामध्ये तुमचे सोशल मीडिया अकाउंट कायमचे डिलीट होऊ शकते. सरकारने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शनच्या शिफारसीनंतर हा निर्णय घेतला आहे. यात सोशल मीडिया युजरला माहिती न देता त्याचे अकाउंट डिलीट केले जाईल. ज्या युजर्सनी गेल्या तीन वर्षात सोशल मीडिया अकाउंट वापरले नाही, त्या अकाउंटद्वारे कोणतीही पोस्ट केली नाही. सरकार त्यांचे अकाउंट बद करु शकते. सोशल मीडियाबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा - U.S. States Sue Meta: फेसबुक आणि इंस्टाग्राममुळे मुलांमध्ये वाढत आहे डिप्रेशन; अमेरिकेमधील 33 राज्यांनी मेटाच्या मालकावर दाखल केला खटला)

हा नियम सर्व ई-कॉमर्स कंपन्या, ऑनलाइन मार्केटप्लेस, गेमिंग कंपन्या तसेच सर्व सोशल मीडिया कंपन्यांनाही लागू केला जाणार आहे. या नवीन नियमानुसार युजर्सचा डेटादेखील मिळेल. सरकारच्या या नियमानुसार, ज्या युजर्संनी खूप दिवस आपले सोशल मीडिया अकाउंट उघडले नाही त्यांचे नुकसान होणार आहे. कारण, सरकार कोणत्याही क्षणी सोशल मीडिया अकाउंट डिलीट करु शकते. अनेकजण पासवर्ड विसरले की नवीन अकाउंट उघडतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. खूप दिवस सोशल मीडिया अकाउंट न वापरल्यास तुमचे अकाउंट डिलीट केले जाईल.