Google’s 22nd Birthday: गुगल चा 22 वा वाढदिवस साजरा करणारे स्पेशल Animated Illustration डुडल
Google’s 22nd Birthday: जगभरातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलचा आज 22 वा वाढदिवस आहे. या खास दिवसानिमित्त गुगलने आपल्या स्पेशल अंदाजात Animated Illustration पद्धतीचे डुडल सादर केले आहे. गुगलचे हे डुडल 90 च्या दशकातील वाढदिवसाच्या सेलिब्रेशन सारखे तयार करण्यात आले आहे. डुडलमध्ये Google चे सर्व Alphabet दाखवण्यात आले असून पहिले अक्षर हे लॅपटॉपच्या स्क्रिनच्या समोर आणि अन्य अक्षरे ही फ्रेम मध्ये दाखवण्यात आली आहेत.(Popular Google Doodle Games: गुगल आज घेऊन आलय Rockmore चं म्युझिकल डुडल; घरी बसल्या असा खेळा हा मजेदार खेळ)
सर्ज इंजिन असलेल्या या गुगलची स्थापना 1998 मध्ये कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या दोन पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी केली होती. लैरी पेज आणि सर्गी ब्रिन अशी त्यांची नावे असून गुगलने डुडल अधिकृतपणे लॉन्च करण्यापूर्वी त्याचे नाव Backrub असे ठेवले होते. मात्र काही काळाने त्याचे नाव गुगल असे ठवले गेले. त्यानंतर आता संपूर्ण जगभरात ते गुगलच्या नावाने प्रसिद्ध आहे. गुगल जगभरात विविध प्रकारच्या माहिती संपादनासाठी एक महत्वाचा हिस्सा असून त्यासाठीच ते तयार करण्यात आले आहे.
दरम्यान, सुरुवातीच्या काळात गुगलचा वाढदिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा करण्यात आला होता. गुगलने त्याचा जन्मदिवस 2005 पर्यंत 7 सप्टेंबर असा ठेवला होता. त्यानंतर गुगलचा वाढदिवस 8 सप्टेंबर आणि पुढे 26 सप्टेंबरला साजरा केला गेला. तर अलीकडेच गुगलने त्याचा वाढदिव, 27 सप्टेंबरला साजरा करण्यास सुरुवात केली आहे.(लोकप्रिय Google डूडल गेम 'हिप हॉप': popular Google Doodle Games सीरिज मध्ये आज गूगलने दिली घरबसल्या Hip hop म्युजिक बनवायची संधी!)
सध्याच्या काळात गुगल जगभरातील स्पेशल ईव्हेंट्स खास डुडलच्या माध्यमातून साजरा करताना दिसून येतात. 1998 मध्ये गुगलने त्यांचे डुडल बनवण्यास सुरुवात केली होती. गुगलने त्यांचे पहिले डुडल बर्निंग मॅन फेस्टिव्हलला सन्मानित करणारे तयार केले होते. गुगलचे जगभरात 100 हून अधिक भाषांमध्ये काम चालते. Alphabet INC, गुगलची पॅरंट कंपनी आहे.