Google Recruitment: खुशखबर! कर्मचारी कपातीनंतर गुगल भारतात करणार 12 हजार नोकरभरती; कोणत्या क्षेत्राला असेल जास्त मागणी? जाणून घ्या

या नोकर्‍या हैदराबाद, बंगळुरू आणि गुरुग्राम कार्यालयांसाठी काढण्यात आल्या आहेत.

Google (Photo Credits: IANS)

Google Recruitment: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या Google ने नुकतेच गेल्या महिन्यात 12,000 लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई (CEO Sundar Pichai) यांनी या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे सांगितले होते. यासोबतच त्यांनी असेही सांगितले होते की, याचा सर्वात आधी अमेरिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल आणि नंतर हळूहळू इतर देशांमध्येही कर्मचारी कपात सुरू केली जाईल. भारतात टाळेबंदी नुकतीच सुरू झाली आहे. दरम्यान, Google ने Linkedin वर भारतातील अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

ज्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत त्यात व्यवस्थापन, स्टार्टअप सक्सेस टीम, कर्मचारी संबंध भागीदार, स्टार्टअप सक्सेस मॅनेजर, गुगल क्लाउड, व्हेंडर सोल्युशन कन्सल्टंट, प्रॉडक्ट मॅनेजर आणि डेटाबेस इनसाइट इत्यादींचा समावेश आहे. या नोकर्‍या हैदराबाद, बंगळुरू आणि गुरुग्राम कार्यालयांसाठी काढण्यात आल्या आहेत. (हेही वाचा -TikTok Layoffs: टिकटॉकने बंद केला भारतामधील संपूर्ण व्यवसाय; सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकले)

वृत्तानुसार, गुगल इंडियाने गुरुवारी रात्री सुमारे 453 कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा बंद केल्याची माहिती देणारा ईमेल पाठवला. बिझनेस लाइन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हा ईमेल गुगलचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी पाठवला आहे. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने गेल्या महिन्यात आपल्या जागतिक शक्तीतील 6 टक्के कपात करण्याची घोषणा केली होती.

फक्त Google नेच कर्मचारी कपात केलेली नाही. तर मेटाने सुमारे 13,000 आणि मायक्रोसॉफ्टने 11,000 लोकांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी माफी मागितली आणि सांगितले की, साथीच्या आजाराच्या काळात आणि त्यापूर्वी कंपनीने अति उत्साही भरती केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अॅमेझॉनने सुमारे 18,000 लोकांना काढून टाकण्याची घोषणा केली होती.

याशिवाय सेल्सफोर्सनेही हजारो लोकांना नोकरीवरून काढून टाकले. या मार्गाचा अवलंब करत अनेक भारतीय कंपन्यांनी जानेवारी महिन्यात एकूण 2100 लोकांना नोकरीवरून काढून टाकले. यामध्ये Swiggy मधून 300, Sharechat मधून 600, Ola मधून 200 आणि Dunzo मधून 90 लेऑफ समाविष्ट आहेत.