Google सांगणार तुमचा पासवर्ड हॅक झाला आहे की नाही, जाणून घ्या

जर तुमचा पासवर्ड एखाद्या हॅकर्सकडून चोरी करण्यात आला असल्यास आता गुगल (Google) तुमची या संबंधी मदत करणार आहे. यापूर्वी कंपनीने पासवर्ड बदलण्यासाठी काही कालावधी युजर्सला दिला होता.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

जर तुमचा पासवर्ड एखाद्या हॅकर्सकडून चोरी करण्यात आला असल्यास आता गुगल (Google) तुमची या संबंधी मदत करणार आहे. यापूर्वी कंपनीने पासवर्ड बदलण्यासाठी काही कालावधी युजर्सला दिला होता. मात्र आता कंपनीने याच्या इनबिल्ट फिचरमध्येच बदल करण्याचा विचार केला आहे. त्यामुळे युजर्सला रियल टाइम पासवर्ड प्रोटेक्शन मिळणार असून कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

गुगल पासवर्ड मॅनेजर अॅन्ड्रॉइड आणि क्रोम सोबत सिंक केलेला असतो. आता कंपनीकडून एक नवे फिचर आणले असून Password Checkup असे त्याचे नाव आहे. त्यामुळे तुमचे लॉग इन कोणत्या बड्या सिक्युरिटी ब्रीचचा हिस्सा आहे की नाही हे कळू शकणार आहे. हे फिचर इनबिल्ट असणार आहे.

पासवर्ड चेकअप या फिचरमुळे तुमचा जर अकाउंट पासवर्ड हॅक करण्यात आला आहे की नाही ते गुगलकडून सांगण्यात येणार आहे. तसेच Low पद्धतीचा पासवर्ड तुम्ही ठेवत असाल त्या संदर्भात ही तुम्हाला कळवले जाणार आहे. आता सध्या गुगल क्रोममध्ये बिल्ट इन पासवर्ड चेक अप दिल्याने पासवर्ड हॅक होण्यासंबंधित तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. कंपनीने हे फिचर टूल सिक्युरिटी इश्यू संबंधित लॉन्च करण्यात आले आहे.(जगातील दुसऱ्या क्रमांकावर भारतात सर्वाधिक इंटरनेट युजर्सची संख्या, रिपोर्टमधून उघड)

गुगलने अकाउंटमध्येच चेकअप ऑप्शन दिले आहे. यावरुन तुमचा पासवर्ड हॅक झाला आहे की नाही हे कळणार आहे. जर तुम्ही शेवटी वापरलेला पासवर्ड यूज करत असल्यास या फिचर टूल मधून सुद्धा तुम्हाला तो वापरता येणार आहे. Password.google.com येथून तुम्हाला अॅक्सेस करता येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement