Google Wallet Contactless Payment App आता भारतामध्येही उपलब्ध; पहा कसं वापरायचं हे अ‍ॅप

त्यामध्ये अनेकप्रकारची कार्ड्स वापरता येऊ शकतात.

Google Wallet

Google Wallet आता भारतामध्ये देखील उपलब्ध झाले आहे. यामुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहार अधिक सोपा होणार आहे. हे कॉन्टॅक्टलेस पेमेंट ॲप केवळ तुमच्या फोनच्या टॅपने पैसे देण्यापुरते मर्यादित राहिले नाही तर हे तुमच्या क्रेडिट कार्ड्स आणि डेबिट कार्ड्ससाठी digital vault आहे. आणि जे टेक वेअरेबल वापरतात त्यांच्यासाठी, Google Wallet ॲप अगदी तुमच्या मनगटावर घेऊन आले आहे. जर एखादी व्यक्ती स्मार्टवॉच WearOS वापरत असेल तर त्याला आता फोन मागे ठेवून देखील केवळ घडाळ्याच्या मदतीने देखील शॉपिंग करता येणार आहे. त्यामुळे व्यवहार सोपा, सुकर होईल.

India Today च्या रिपोर्टनुसार, Google Wallet आता भारतीय ग्राहकांना देखील उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना आता व्यवहारासाठी कार्ड्स, पैसे यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. अधिक सुरक्षित आणि जलद व्यवहार पद्धती शोधणाऱ्या लाखो व्यक्ती या बदलाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे. Starlink Receives Government Approval: लवकरच भारतामध्ये उपलब्ध होऊ शकते Elon Musk यांच्या स्टारलिंकची इंटरनेट सेवा; मंत्रालयाकडून मिळाली तत्वतः मान्यता .

Google Wallet कसं वापरायचं आहे?

युजर्सची सुरक्षितता धोक्यात न घालता गूगल व्हॉलेट्स उपलब्ध केलं जाणार आहे. या अ‍ॅप मध्ये पेमेंटची माहिती pin protection feature ने सुरक्षित केलेली असेल. तुमचा फोन हरवल्यास वॉलेट देखील लॉक करता येणार आहे. Google Wallet app चं काम WearOS-powered smartwatches वर देखील होणार आहे. याचा अर्थ पेमेंट करणं हे आता केवळ टॅप करून व्यवहार पूर्ण करणं इतकं सोप्प होणार आहे. हा contactless payment experience असणार आहे.

Google Wallet हा एक सुरक्षित डिजिटल व्हॉलेटचा पर्याय आहे. त्यामध्ये अनेकप्रकारची कार्ड्स वापरता येऊ शकतात. डेबिटकार्ड, क्रेडिट कार्ड सोबत गिफ्ट कार्ड्स देखील वापरता येतील. Google Wallet द्वारा ऑनलाईन पेमेंट हे वेबसाईट आणि अ‍ॅप वर देखील करता येईल. हे युजर्सना ईमेल अ‍ॅड्रेस किंवा फोन नंबर असलेल्या कोणाकडूनही पैसे पाठवण्यास आणि स्वीकारण्यास मदत करणार आहे.