Google ने सांगितले 'या' पद्धतीने असला पाहिजे तुमचा पासवर्ड, हॅकर्स सुद्धा मानतील हार
या दिवशी आज जगातील सर्वाधिक मोठे असलेले सर्च इंजिन गुगल (Google) यांनी युजर्सला पासवर्ड कसा असावा याबाबत अधिक माहिती दिली आहे.
सध्याच्या दिवसात हॅकिंगचे सर्वाधिक प्रकार समोर येत आहेत. याच कारणास्तव तुमचा पासवर्ड असा असावा की हॅकर्स सुद्धा तो क्रॅक करु शकणार नाहीत. बहुतांश लोक हे अक्षरांचा पासवर्ड ठेवतात त्यामुळे तो सहज लक्षात राहू शकतो. तसेच हॅकर्स विविध मार्गांचा उपयोग करुन युजर्सची खासगी माहिती लीक करु शकतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून युजर्सने सावध रहावे अशा सुचना ही दिल्या जातात. तर प्रत्येक वर्षाला मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी 'वर्ल्ड पासवर्ड डे' (World Password Day) साजरा केला जातो. या दिवशी आज जगातील सर्वाधिक मोठे असलेले सर्च इंजिन गुगल (Google) यांनी युजर्सला पासवर्ड कसा असावा याबाबत अधिक माहिती दिली आहे.
गुगलच्या मते पासवर्ड मध्ये कमीत कमी 8 कॅरेक्टर्स असावेत. पासवर्ड Strong बनवण्यासाठी यामध्ये काही Small आणि Capital अक्षरांचा समावेश असवा. तसेच क्रमांक किंवा Symbols यांचा सुद्धा तुम्ही पासवर्डसाठी उपयोग करु शकता. मात्र पासवर्ड सेट करताना त्यांच्या महत्वपूर्ण अकाउंटसाठी विविध पासवर्ड्सचा उपयोग करावा. युजर्सने कधीच एकच पासवर्ड प्रत्येक अकाउंटासाठी वापरु नये असा सल्ला ही दिला आहे. काही युजर्स अगदी सोपा पासवर्ड ठेवतात. जसे त्यांचे निकनेम, शाळेचे नाव, आवडीची स्पोर्ट टीम किंवा पासवर्ड असे शब्द वापरतात. पासवर्ड असा असावा की ज्याचा अंदाज अगदी सहज लावला जाऊ शकत नाही.(लोकप्रिय Google डूडल गेम 'हिप हॉप': popular Google Doodle Games सीरिज मध्ये आज गूगलने दिली घरबसल्या Hip hop म्युजिक बनवायची संधी!)
गुगलने असे सांगितले आहे की, युजर्सने त्यांची खासगी माहिती जसे नाव. पत्ता, फोन क्रमांक, ईमेल हे सगळे पासवर्ड मध्ये सहभागी करु नये. नेहमी आपला पासवर्ड काही कालावधी नंतर बदलणे आवश्यक आहे. काही कारणास्तव तुम्ही एखाद्याला पासवर्ड दिल्यास तो लगेच बदलल्यास तुमचा फायदा होईल. ऐवढेच नाही तर अधिक मजबूत पासवर्ड असेल तर हॅकर्स सुद्धा तो क्रॅक करण्यास हार मानतील.