Tik Tok ला टक्कर देण्यासाठी Google लवकरच लॉन्च करणार नवं अ‍ॅप

मात्र आता टिकटॉकला टक्कर देण्यासाठी गुगल (Google) एक नवं अॅप लवकरच लॉन्च करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Google (Photo: Shutterstock)

सोशल मीडियावरील व्हिडिओ बनवण्यासाठी युजर्सच्या पसंदीचे टिक टॉक (Tik Tok) अॅपचे सध्या अनेक फॉलोअर्स जगभरातून आहेत. मात्र आता टिकटॉकला टक्कर देण्यासाठी गुगल (Google) एक नवं अॅप लवकरच लॉन्च करणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच वॉल स्ट्रीट जर्नल यामध्ये छापून आलेल्या वृतता असे सांगितले आहे की, गुगल अमेरिकेच्या पॉप्युलर सोशल व्हिडिओ शेअरिंग अॅप फायरवर्कला (Firework App) खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

फायरवर्कला खरेदी केल्यानंतर गुगलसह चीन मधील सर्वात प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट Weibo सुद्धा खरेदी करण्याचा विचार करत आहे. असे सांगितले जात आहे की, फायरवर्कला खरेदी करण्याचा स्पर्धेत गुगल हे अन्य कंपनीच्या समोर दुसऱ्या क्रमांकावर आहे. फायरवर्कने गेल्या महिन्यातच भारतात एन्ट्री केली आहे. पैसे उभे करण्यासाठी कंपनीची किंमत या वर्षाच्या सुरुवातील 100 मिलियन डॉलर्स पर्यंत आली होती. तर टिकटॉकची संलग्न कंपनी बाइटडांस यांची वॅल्यू 75 मिलियन डॉलर्स होती. फायरवर्क लूप नाउ टेक्नॉलॉजी द्वारे तयार करण्यात आलेल्या अॅपचा एक भाग आहे. लूप नाउ टेक्नॉलॉजी ही एक अमेरिकेतील स्टार्टअप कंपनी असून ती पुढच्या पीढीसाठी मोबाईल अॅप्लिकेशन बनवण्याचे काम करते.(Google सांगणार तुमचा पासवर्ड हॅक झाला आहे की नाही, जाणून घ्या)

 लहान व्हिडिओ बनवणे किंवा पोस्ट करण्यासाठी टिकटॉकपेक्षा फायरवर्क अधिक वेगळे आहे. फायरवर्क येथे युजर्सला 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवण्याची संधी देते. तर टिकटॉकवर 15 सेकंदाचा युजर्स व्हिडिओ बनवू शकता. तसेच फायरवर्क येथे उभ्या किंवा आडव्या पद्धतीने सुद्धा व्हिडिओ युजर्सला शूट करता येणार आहेत. या फिचरचे नाव कंपनीने Reveal असे ठेवले आहे.

फायरवर्क हे अॅप आयओएस आणि अॅन्ड्रॉइड या स्मार्टफोन युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या अॅपचा वापर करणाऱ्या युजर्सची संख्या 10 लाखपेक्षा अधिक आहे. कंपनीला अशी आशा आहे की टिकटॉक सारखाच हा अॅप सुद्धा युजर्सच्या पसंदीला पडेल.