Google कडून मोठ्या बदलावांची घोषणा, फोनमध्ये असलेले 'हे' App होणार ब्लॉक
गुगलच्या अपडेटनुसार आता अॅप डेव्हलपर्सला 5 मे पासून एक ठोस आणि संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे
गुगलकडून (Google) आपल्या Play Store छ्या सिस्टिमध्ये 5 मे पासून मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. गुगलच्या अपडेटनुसार आता अॅप डेव्हलपर्सला 5 मे पासून एक ठोस आणि संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे की, एका अॅपला युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या दुसऱ्या अॅपची माहिती एक्सेस करण्याची परवानगी का द्यावी. Arstechnica च्या रिपोर्टमध्ये याचा खुलासा करण्यात आला आहे. गुगलने आपल्या डेव्हलपर्स प्रोग्राम पॉलिसीमध्ये अपडेट केले आहे. जे एक अॅप दुसऱ्या अॅपचे एक्सेस करण्याची परवानगी देण्यापासून रोखतात. सध्याच्या काळात अॅन्ड्रॉइड 11 अॅप हे तुमच्या डिवाइसमध्ये असलेले सर्व अॅप प्रमाणे परवानगी मागतात.(Realme X7 Pro एक्सट्रीम स्मार्टफोन लॉन्च, युजर्सला 64MP कॅमेऱ्यासह 4500mAh ची मिळणार बॅटरी)
Google Play Store मध्ये काही अॅप असे आहेत जे तुम्ही Installed केल्यानंतर तुमच्याकडे अन्य अॅप एक्सेस करण्याची परवानगी मागतात. अशातच तुमच्या फोनमध्ये दुसरे अॅप मध्ये जर संवेदनशील माहिती जसे बँकिंग, राजकीय संबंधित काही गोष्टी किंवा पासवर्ड मॅनेजमेंटची माहिती एक्सेस करु शकतात. गुगलकडून आता अॅप डेव्हलपर्सला अॅप लॉन्च करण्यामागील उद्दिष्ट, सर्च आणि इंटरऑपरेट बद्दल माहिती विचारली जाणार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्वत बँकिंग अॅपकडून अशा पद्धतीची माहिती घेतली जात नाही.(Facebook Users Data Leaked : 50 कोटींपेक्षा अधिक फेसबुक यूजर्स चा डाटा लीक, फोन क्रमांकसह इतरही माहिती सार्वजनिक)
गुगलकडून 5 मे पासून हेरगिरी करणारे अॅप बंद करण्याचे काम सुरु केले जाणार आहे. खंरतर गुगल प्ले स्टोअरवर मोठ्या संख्येने अशा पद्धतीचे अॅप उपलब्ध आहेत. जे हेरगिरी करण्याचे काम करतात. त्यामुळे आता अशा अॅपच्या विरोधात कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.