Google Search साठी आले Dark मोड फिचर, युजर्सला 'या' पद्धतीने करता येईल अॅक्टिव्हेट

अशातच आता कंपनीने आपला सर्च प्लॅटफॉर्म गुगल सर्चससाठी एक प्रसिद्ध आणि युजर्सच्या अधिक वापरात येणारे फिचर म्हणजे डार्क मोड (Dark Mode) रोलआउट केले आहे.

Google (Photo Credits: Google)

टेक दिग्गज गुगल (Google) कडून आपल्या युजर्ससाठी नेहमीच उत्तम फिचर्स आणले जाते. अशातच आता कंपनीने आपला सर्च प्लॅटफॉर्म गुगल सर्चससाठी एक प्रसिद्ध आणि युजर्सच्या अधिक वापरात येणारे फिचर म्हणजे डार्क मोड (Dark Mode) रोलआउट केले आहे. कंपनीने आपल्या वेबव डेस्कटॉसाठी हे फिचर आणले आहे. फेब्रुवारी महिन्यात टेस्टिंग सुरु होती त्यानंतर आता अखेर अधिकृतरित्या रोलआउट केले आहे.(Facebook वाचत आहे तुमच्या WhatsApp चे प्रायव्हेट मेसेजेस; एजन्सींसोबत शेअर केले जात आहे चॅट्स, ProPublica अहवालातून धक्कादायक माहिती समोर)

डार्क मोड हे डेस्कटॉप युजर्ससाठी रोलआउट करणे सुरु केले आहे. असे म्हटले जाते की, पुढील काही आठवड्यातच हे संपूर्ण युजर्सपर्यंत पोहचले जाईल. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा हे फिचर अॅक्टिव्हेट करायचे असेल तर काही सोप्प्या स्टेप्सचा वापर करावा लागणार आहे.(Google Maps, Gmail आणि YouTube येत्या 27 सप्टेंबर पासून 'या' स्मार्टफोनमध्ये होणार बंद)

-कोणत्याही ब्राउजरमध्ये Google Search सुरु करा.

-टॉप राइट कॉर्नरवर तुम्हाला सेटिंग्सचे ऑप्शन मिळेल ते टॅप करा.

-Search सेटिंग ऑप्शन मध्ये जात appearance ऑप्शनवर टॅप करा.

-आपल्या आवडीचा रंग निवडून सर्वात खाली Save ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

गुगलने एका सपोर्ट पेजद्वारे खुलासा केला आहे की डार्क थीम गुगल होमपेज, सर्च रिझल्ट पेज आणि सर्च सेटिंग्ज इत्यादींवर लागू केली जाईल. कोणत्या वापरकर्त्यांना सक्षम केल्यानंतर त्यांच्या वेबची थीम काळ्या रंगात दिसेल. तर डार्क मोड ही एक प्रकारची ब्लॅक थीम आहे, जी ऑन केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये डार्क थीमचा प्रभाव मिळतो. डार्क मोड एकूणच ऑपरेटिंग सिस्टीम (OS) किंवा अॅप्लिकेशनचा रंग काळ्या रंगात बदलतो. याला डार्क मोड म्हणतात. डार्क मोड चालू करणे आपल्या डोळ्यांसाठी चांगले आहे. तसेच आपल्या फोनची बॅटरी वाचवणे, जास्त ब्राइटनेसमुळे आपल्या डोळ्यांवरही परिणाम होण्यापासून आपण बचावतो.