Google Play Music App झाले बंद; वापरकर्त्यांना म्यूझिकसाठी वापरावं लागेल YouTube Music अॅप

गूगलचं हे अॅप वापरणार्‍या वापरकर्त्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. कारण कंपनीने प्ले म्युझिक अॅप अधिकृतपणे बंद केले आहे. म्हणजेचं आता वापरकर्ते हे अ‍ॅप वापरण्यास सक्षम राहणार नाहीत. विशेष म्हणजे गूगल प्ले म्युझिक अॅपऐवजी आता कंपनी YouTube Music अॅप वापरण्याचा सल्ला देत आहे.

Google Play Music (PC - Pixabay)

Google Play Music App: गेल्या काही दिवसांपूर्वी Google ने आपले लोकप्रिय Play Music अॅप बंद करण्याचा विचार केला होता. गूगलचं हे अॅप वापरणार्‍या वापरकर्त्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. कारण कंपनीने प्ले म्युझिक अॅप अधिकृतपणे बंद केले आहे. म्हणजेचं आता वापरकर्ते हे अ‍ॅप वापरण्यास सक्षम राहणार नाहीत. विशेष म्हणजे गूगल प्ले म्युझिक अॅपऐवजी आता कंपनी YouTube Music अॅप वापरण्याचा सल्ला देत आहे. गूगल प्ले म्युझिक अॅप बंद करण्यात आले असून हे अ‍ॅप उघडल्यानंतर एक सूचना दिली जात आहे की, आपण त्याऐवजी आता YouTube Music अॅप वापरू शकता. कंपनीचे म्हणणे आहे की, गुगल प्ले म्युझिक वापरकर्त्यांना युट्यूब म्युझिकमध्ये (Youtube Music) शिफ्ट करण्यात आले आहे. येथे आपल्याला Google Play Music आणि आपली प्ले सूचीची सर्व यादी मिळेल. (हेही वाचा - WhatsApp च्या माध्यमातून आता युजर्सला करता येणार शॉपिंग, कंपनी लवकरच घेऊन येणार नवे फिचर)

दरम्यान, यूट्यूब म्युझिकवर (Youtube Music) आल्यानंतर, वापरकर्त्यांना या अ‍ॅपमध्ये गुगल प्ले म्युझिक वर तयार केलेली लायब्ररी आणि प्लेलिस्ट सहज उपलब्ध होईल. आपण देखील Google Play Music वापरत असल्यास आपल्याला त्यामधील कंटेटबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कंपनीने आपला कंटेंट Youtube Music कडे हस्तांतरित केली आहे. डिसेंबर 2020 पर्यंत कंपनी आपल्या सर्व वापरकर्त्यांना Youtube Music वर शिफ्ट करेल. (वाचा - WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅप वर अनावश्यक चॅट टाळण्यासाठी त्याचा आवाज करा 'कायमचा Mute', फॉलो करा या सोप्या स्टेप्स)

गूगलने Play Music अॅप 2011 मध्ये लाँच केले होते. त्यानंतर काही दिवसानंतर कंपनीने फक्त बीटा आवृत्तीमध्ये हे अॅप उपलब्ध करून दिले होते. तथापि, यावर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने या सेवेची अंतिम आवृत्ती सादर केली. आता 8 वर्षांनंतर ही सेवा थांबली असून कंपनीने याचा अंदाज युट्यूब म्युझिकच्या लाँचिंग दरम्यान दिला होता. ही सेवा दोन महिन्यांपूर्वी भारतात सुरू करण्यात आली होती. आपण एका महिन्यासाठी हे अॅप विनामूल्य वापरु शकता. परंतु, एका महिन्यानंतर आपल्याला यासाठी सदस्यता घ्यावी लागणार आहे.