Google Pay ‘Go India’ Game: गूगल पे वर 'गो इंडिया' गेम कसा खेळायचा? तिकिट्स, कॅश रिवॉर्ड्स मिळवत अशी पूर्ण करा व्हर्च्युअल ट्रीप!
मग आता तुमची या ‘Go India’ खेळाबद्दल उत्सुकता वाढली असेल तर पहा हा खेळ नेमका आहे तरी काय? खेळायचा कसा?
कोरोना संकटाच्या प्रादुर्भावामुळे यंदा आपल्याला कुणालाच बिनधास्त बाहेर पडण्याची, भटकंती करण्याची मुभा नाही. दरम्यान घरात बसूनच हा लॉकडाऊन असा अजून किती दिवस चालणार याची अनिश्चितता आहे पण आता तुमचा वेळ थोडा मजेशीर घालवण्यासाठी गुगल पे ने सध्याच्या फेस्टिव्ह सीझन मध्ये ' गो इंडिया' या नवा गेम आणला आहे. Android आणि iOS युजर्स या दोघांनाही हा धम्माल खेळ मोबाईलवर खेळता येणार आहे. दरम्यान हा खेळ खेळणार्यांना विविध टप्प्यावर आकर्षक ऑफर्स आणि 501 रूपयांपर्यंतचे रिवॉर्ड्स देखील आहे. मग आता तुमची या ‘Go India’खेळाबद्दल उत्सुकता वाढली असेल तर पहा हा खेळ नेमका आहे तरी काय? खेळायचा कसा?
गो इंडिया मध्ये युजर्सना व्हर्च्युअली भारतातील विविध शहरांना भेटी देता येणार आहेत. यामध्ये विशिष्ट किलोमीटरचा टप्पा पार केला की तुम्हांला नव्या शहराचं तिकीट मिळणार आहे. युजर्सला यामध्ये ‘Go India Champion’किताब दिला जाईल आणि 501 रूपयांपर्यंतच्या कॅश रिवॉर्डची संधी मिळणार आहे. हा खेळ सुरू करण्यापूर्वी तुम्हांला मुंबई, दिल्ली, हैदराबाद अशा विविध शहरांच्या नावांची तिकीटं आवश्यक आहेत.
शहरांची तिकीटं कशी मिळवाल? किलोमीटरचं गणित जुळवाल?
तिकीटाच्या माध्यमातूनच तुम्ही शहरामध्ये प्रवास करू शकाल आणि रिवॉर्ड मिळवू शकतात. व्हर्च्युअल कार आणि त्यामधील प्रवासासाठी तुम्हांला किलोमीटर्सची मजल दरमजल करत पुढे जावं लागणार आहे. तुम्हांला युपीआय ट्रानझॅक्शन मधून तिकीट किंवा किमीचा टप्पा ओलांडता येऊ शकतो. युजर्स तिकीट विकतही घेता येऊ शकतं मात्र त्यासाठी तुम्ही व्हच्युअर्ली फिरताना काही फोटो, मॅप शेअर करावे लागणार आहेत.
तिकीट किंवा किमीचा टप्पा पार करण्याचा अजून काही पर्याय म्हणजे प्रिपेड फोन रिचार्ज करणं, गूगल प्ले रिचार्जसाठी पे करणं, बिलं भरणं, सोने खरेदी किंअवा मेक माय ट्रिपसाठी पेमेंट करणं. बॅंक अकाऊंटस मधील व्यवहार, मित्रांसोबत व्यवहार, UPI ID सोबत व्यवहार करून देखील किलोमीटर्स वाढवता येऊ शकतात.
दरम्यान गूगल पेच्या या गो इंडिया गेममध्ये सार्या शहरांची भटकंती पूर्ण करून रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी 25 नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे. दिवसाला तुम्ही 3 शहरांचा फेरफटका मारू शकता. दरम्यान काही दिवसांपूर्वी गूगलने डूडलच्या माध्यमातून अशाच प्रकारे काही जुने गेम्स पुन्हा लॉन्च करत युजर्सचा लॉकडाऊन मधील कंटाळवाणा दिवस थोडा चार्ज अप करण्याचा प्रयत्न केला होता.