डिजिटल व्यवहारांमध्ये Google Pay ला ग्राहकांची पसंती; स्पर्धेत BHIM App सर्वात मागे

ऑनलाईन ट्रान्झिशनसाठी ग्राहकांची पसंती ही गुगल पेला असलेली दिसून आली आहे. महत्वाचे म्हणजे या स्पर्धेत भाजप सरकारचे भीम अॅप फारच मागे पडल्याचे दिसून आले आहे.

Google Pay (File Photo)

नोटबंदीनंतर भारतामध्ये प्लास्टिक मनीला (Plastic Money) चालना मिळाली, लोक डिजिटल व्यवहारांवर भर देऊ लागले. यासाठी बाजारात पेटीएम (Paytm), गुगल पे (Google Pay), भीम (BHIM) अशी अनेक अॅप्स आली. त्यात प्रत्येक बँकांनी त्यांची स्वतःची अॅप्सदेखील मार्केटमध्ये आणली. या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी हे अॅप्स ग्राहकांना विविध ऑफर्स देऊन आकर्षित करू लागले. यासर्वांमध्ये बाजी मारली ती गुगल पे या अॅपने. ऑनलाईन ट्रान्झिशनसाठी ग्राहकांची पसंती ही गुगल पेला असलेली दिसून आली आहे. महत्वाचे म्हणजे या स्पर्धेत भाजप सरकारचे भीम अॅप फारच मागे पडल्याचे दिसून आले आहे.

भीम डिजिटल इंडियाला फक्त दोन वर्षांत गुगल पे ने मागे टाकले आहे. पेमेंट सोल्यूशन कंपनी Razorpay नुसार, 2019 मध्ये ऑनलाइन ट्रान्झिशनमध्ये अर्धाहून अधिक मार्केट (54 टक्के) गुगल पेने काबीज केले आहे. दुसऱ्या स्थानावर 11.9 टक्केसह फोनपे (Phone pay) आहे. पेटीएम ची बाजारपेठ 9.7 टक्के, तर व्हाट्सएपचे मार्केट 8.5 टक्के आहे. या स्पर्धेमध्ये भीम अॅप फक्त 4.1 टक्के बाजार काबीज करू शकला आहे. (हेही वाचा: UPI च्या माध्यमातून पैसे पाठवताना 'या' पद्धतीने काळजी घ्या, नाहीतर फसवणूक होईल)

मोदी सरकारने मोठा गाजावाजा करून बीम अॅप सादर केले होते. देशातील खास गरीब जनतेला डोळ्यासमोर ठेऊन या अॅपची निर्मिती केली होती, मात्र या अॅपला जनतेने नापसंती दर्शवली आहे. दरम्यान, सध्या मिळालेल्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये 300 बिलियन डॉलरचे ऑनलाईन ट्रान्झिशन झाले, तर, 2022 पर्यंत यामध्ये वाढ होऊन हा आकडा 1000 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचणार आहे. यावर्षी ऑनलाईन पैशांचे व्यवहार करणाऱ्या लोकांमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2023 पर्यंत देशातील 50 टक्के जनता ऑनलाईन ट्रान्झिशन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif