Google Maps ची Street View Service भारतामध्ये लॉन्च; मुंबई, दिल्ली सह या 10 शहरांत मिळणार सेवा
गूगलने दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रीट व्ह्यू सर्व्हिस भारतामध्ये बेंगलूरू, चैन्नई, दिल्ली, मुंबई, नाशिक, पुणे, हैदराबाद, वडोदरा, अहमदनगर आणि अमृतसरमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आली आहे.
Alphabet Inc (GOOGL.O) च्या Google Maps कडून भारतामध्ये अखेर Street View Service लॉन्च केली आहे. सध्या ही सेवा भारतामध्ये 10 शहरांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यासाठी Tech Mahindra आणि Genesys यांचे सहकार्य असल्याची माहिती अधिकार्यांकडून देण्यात आली आहे.
भारत सरकारकडून यापूर्वी गूगल मॅप्सच्या या सेवेला नाकारण्यात आले होते. यामध्ये रस्त्यांच्या पॅनरोमिक इमेजेस दाखवल्या जात असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हिरवा कंदील दिला जात नव्हता. असे लोकल मीडीयाकडून सांगण्यात आले आहे.
गूगलने दिलेल्या माहितीनुसार गूगल मॅप्सच्या या स्ट्रीट व्ह्यू सर्व्हिस साठी लोकल पार्टनर्स कडून सारी माहिती मिळवण्यात आली आहे. 2022 च्या वर्षाअखेरीस ही सेवा भारतामध्ये 10 शहरांवरून 50 शहरांवर नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नक्की वाचा: Google Maps चे नवे लोकेशन शेअरिंग फिचर; आता Exact Location शेअर करणे अधिक सोपे .
गूगलने दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रीट व्ह्यू सर्व्हिस भारतामध्ये बेंगलूरू, चैन्नई, दिल्ली, मुंबई, नाशिक, पुणे, हैदराबाद, वडोदरा, अहमदनगर आणि अमृतसरमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 1,50,000 किमी रस्त्याचा समावेश आहे. गूगल मॅप्सचं हे नवं फीचर वापरण्यासाठी युजर्सना गूगल मॅप्स ओपन करावं लागेल. हे मोबाईल फोन किंवा संगणकावर उघडता येऊ शकतं. त्यानंतर सध्या सुरू करण्यात आलेल्या 10 शहरांमध्ये तुम्ही रस्त्यांवर झूम करून तो भाग पाहू शकता. त्यासाठी त्या विशिष्ट भागावर टॅप करा.