Gmail आणि Hangout साठी गुगलने आणले नवे फिचर, जाणून घ्या

या फिचरच्या मदतीने युजर्सला इमेल आणि पिंग (चॅट नोटिफिकेशन) अलर्ट मिळणार नाही आहे. पण युजर्सने गुगल कॅलेंडर मध्ये Out Of Office नावाने मार्क करु शकता.

Gmail | Representational Image | (Photo Credits: Twitter)

गुगलने Gmail आणि Hangout युजर्ससाठी एक नवे फिचर आणले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्सला इमेल आणि पिंग (चॅट नोटिफिकेशन) अलर्ट मिळणार नाही आहे. पण युजर्सने गुगल कॅलेंडर मध्ये Out Of Office नावाने मार्क करु शकता. इमेल चॅट पाठवणाऱ्या युजर्सला हे फिचर इमेल कंपोज करताना किंवा हॅंगआउटच्या चॅट विंडोमध्ये एका बॅनर स्वरुपात दिसणार आहे.

परंतु इमेल मिळालेल्या युजरला त्याच्या नावापुढे आउट ऑफ ऑफिस असे लिहिलेले दिसणार आहे. त्याचसोबत यामध्ये तुम्ही समोरील युजर्सला कधी पर्यंत मेसेज पाठवू शकता. तसेच गुगलने त्यांच्या ब्लॉगपोस्ट मध्ये असे लिहिले आहे की, हे फिचर लॉन्च झाल्यानंतर इमेल मधील Send ऑप्शनवर क्लिक करण्यापूर्वीच युजर्स आउट ऑफ ऑफिस मध्ये असल्याचे नोटिफिकेशन देण्यात येणार आहे. त्यामुळे युजर्सला येणारे Unkown Mail किंवा चॅट पासून दूर राहता येणार आहे. सोप्या भाषेत बोलायचे झाले तर गुगलचे हे फिचर एका प्रकारे Do Not Disturb सारखे आहे.(Chrome Browser वरुन गुगल काही फिचर्स हटवण्याच्या तयारीत, हे आहे कारण)

तर गुगल हँगआउट बंद होणार असल्याचे गुगले सांगितले होते. मात्र बंद होण्याची तारीख गुगल कडून वाढवण्यात आली असून जून 2020 पर्यंत अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे. मात्र हँगआउट पूर्णपणे बंद झाल्यानंतर त्याचे दोन भागात विभाजन होणार आहे. एक म्हणजे Meet आणि दुसरा Chat.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif