Google Pixel Smartphone: गुगलने चीनला दिला झटका; आता भारतात बनणार पिक्सेल फोन, जाणून घ्या कसा होणार फायदा?
Pixel 8 Pro हा स्मार्टफोन कंपनी लवकरच लॉन्च करेल. यानंतर, Apple एप्रिल-जून तिमाहीत भारतात फोनचे उत्पादन सुरू करेल. मात्र, भारतात किती स्मार्टफोन बनवले जातील याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
Google Pixel Smartphone: भारतासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गुगल (Google) भारतासाठी सतत नवनवीन योजना आणत आहे. पिक्सेल फोन (Pixel Smartphone) च्या उत्पादनाबाबत गुगलने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. गुगलने पुरवठादाराला पुढील तिमाहीपासून भारतात पिक्सेल फोनचे उत्पादन सुरू करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ कंपनी पहिल्यांदाच भारतात आपली उत्पादने तयार करण्याचा विचार करत आहे. गुगलने यावर्षी भारतात 10 दशलक्ष पिक्सेल फोन पाठवण्याची योजना आखली आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीने सांगितले होते की, गुगल भारतात आपल्या फोनचे उत्पादन सुरू करणार आहे. गुगलचा फ्लॅगशिप Pixel 8 भारतात 2024 पासून उपलब्ध होईल. आतापर्यंत गुगल पिक्सेलचे उत्पादन चीनमध्ये केले जात होते, मात्र आता त्याचे उत्पादन भारतात सुरू होणार आहे. कंपनी पुरवठा साखळीतही बदल करण्याच्या विचारात आहे. (हेही वाचा -Amazon’s Bazaar: ॲमेझॉनची भारतात कमी किमतीत फॅशन व्हर्टिकल 'बाझार' सुरू करण्याची योजना)
गुगल भारतासाठी एक नवीन योजना बनवत आहे. Pixel 8 Pro हा स्मार्टफोन कंपनी लवकरच लॉन्च करेल. यानंतर, Apple एप्रिल-जून तिमाहीत भारतात फोनचे उत्पादन सुरू करेल. मात्र, भारतात किती स्मार्टफोन बनवले जातील याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. याशिवाय हे स्मार्टफोन्स फक्त भारतासाठी बनवले जातील की एक्सपोर्टही केले जातील हे स्पष्ट नाही. (हेही वाचा - Google 300% Salary Hike: नोकरी सोडून जाणार होता गुगलचा कर्मचारी, कंपनीने दिली 300% पगारवाढ; Perplexity AI च्या सीईओचा खुलासा)
दरम्यान, असा अंदाज वर्तवला जात आहे की Pixel 8 Pro ची किंमत देखील लक्षणीयरीत्या कमी केली जाऊ शकते. इतर स्मार्टफोन कंपन्यांच्या बाजारपेठेला लक्ष्य करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.