Google Down: YouTube, Drive, Gmail, Duo, Meet, Hangouts, Docs, Sheets यांसह अनेक सेवांना फटका; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
दावा केला जात आहे की, गुरुवारी सकाळी गूगल सेवा डाऊन झाली. ज्यामुळे गूगलच्या अनेक सेवांवर परिणाम झाला. खास करुन यूट्यूब (YouTube), ड्राइव्ह (DriveDrive), जीमेल (Gmail) आणि सर्च इंजिनवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. गूलल डाऊन झाल्याच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाहायला मिळाला.
Google Down झाल्याच्या वृत्ताने नेटीझन्सना चांगलाच धक्का बसला आहे. दावा केला जात आहे की, गुरुवारी सकाळी गूगल सेवा डाऊन झाली. ज्यामुळे गूगलच्या अनेक सेवांवर परिणाम झाला. खास करुन यूट्यूब (YouTube), ड्राइव्ह (DriveDrive), जीमेल (Gmail) आणि सर्च इंजिनवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. गूलल डाऊन झाल्याच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाहायला मिळाला. टेक आऊटेजबद्दल माहिती तेताना एका ऑनलाईन टूल डाऊनडिटेक्टरच्या मते गूगल आऊटेज झाल्याची भारतात सुमारे 1.500 पेक्षाही अधिक तक्रारी आढळून आल्या.
गूगल डाऊन झाल्याचे लक्षात येताच नेहमीप्रमाणे ट्विटर वापरकर्ते भलतेच सक्रीय झाले. त्यांनी नेहमीप्रमाणे मिम्स बनवून गूगलला धारेवर धरले. खास करुन YouTube, Drive, Gmail, Duo, Meet, Hangouts, Docs, Sheets यांसारख्या गूगल प्रणीत अॅप्स आणि वेबसाइट्स देखील डाउन झाल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा, Twitter Increase Tweets Characters: ट्विटर वापरकर्ते लवकरच 10 हजार वर्णांपर्यंतचे ट्विट पोस्ट करू शकणार; Elon Musk यांची माहिती)
ट्विट
ट्विट
ट्विट
ट्विट
Downdetector ने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये जीमेल वापरकर्त्यांना आलेल्या तक्रारींची संख्या सुमारे 2,000 पेक्षा अधिक आहेत. सोबतच जीमेल साईन इन करताना 502 वापरकर्त्यांना अडथळे आले. ज्याचे स्क्रीनशॉट त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. सर्वसाधारण बहुसंख्यांनी 502 एररचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. त्यामुळे सहसा सर्व्हर प्रतिसाद देत नाही, असा सूर उमटताना दिसतो आहे.