Google Doodle COVID-19 Prevention: कोरोनाव्हायरस प्रतिबंध- 'मास्कचे महत्त्व कमी झाले नाही, मास्क वापरा जीव वाचवा', गूगल डूडल साकारत महत्त्वपूर्ण संदेश

आजच्या गूगल डूडलच्या माध्यमातून 'मास्कचे महत्त्व कमी झाले नाही, मास्क वापरा जीव वाचवा' असा संदेश देतानाच 'कोरोनाव्हायरस प्रतिबंध' (COVID-19 Prevention) करण्यासाठी काय करायला हवे याबाबत काही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

Google Doodle | (Photo Credits: Google)

Google Doodle Coronavirus Prevention: देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus ) संक्रमितांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जग कोरोना व्हायरस ( Coronavirus Prevention) संकटाचा सामना करताना चिंतेत आहे. कोरोनाबाबत जनजागृती मोहीम जगभरात राबवली जात आहे. अशा स्थितीत इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन अशी ओळख असणाऱ्या गूगलनेही खास डूडल ( Google Doodle) बनवून सामाजिक संदेश दिला आहे. जनजागृती केली आहे. आजचे गूगल डूडल (Google Doodle COVID-19 Prevention) नेहमीप्रमाणेच खास आहे. आजच्या गूगल डूडलच्या माध्यमातून 'मास्कचे महत्त्व कमी झाले नाही, मास्क वापरा जीव वाचवा' असा संदेश देतानाच 'कोरोनाव्हायरस प्रतिबंध' (COVID-19 Prevention) करण्यासाठी काय करायला हवे याबाबत काही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

आजच्या गूगल डूडलमध्ये सांगण्यात आले आहे की, कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क वापरणे किती आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर गुगलने म्हटले आहे की, 'मास्कचे महत्त्व कमी झाले नाही, मास्क वापरा जीव वाचवा' गूगल डूडलने आपल्या प्रतिमेत ज्या काही प्रतिकात्मक प्रतिमा वापरल्या आहेत त्यात मास्कचा मोठ्या आकर्षकपणे वापर करण्यात आला आहे. कोरोना संदर्भात काळजी घेण्यासाठी गूगलने दिलेली महत्त्वपूर्ण माहिती खालील प्रमाणे. (हेही वाचा, Spring Season 2021 च्या स्वागतासाठी Google चे खास रंगीबेरंगी Doodle)

COVID-19 चा प्रसार प्रतिबंधित करण्यासाठी:

मास्क

मास्क इतरांना मास्क घातलेल्या व्यक्तीपासून व्हायरसचा प्रसार रोखण्यास मदत करू शकते. एकटे मास्क COVID-19 पासून संरक्षण देत नाही आणि शारीरिक अंतर आणि हात स्वच्छ करून एकत्रित केले पाहिजे. आपल्या स्थानिक आरोग्य प्राधिकारणाद्वारे प्रदान केलेल्या सल्ल्याचे अनुसरण करा.

जनहिताचा संदेश देणारे आजचे गूगल डूडल हे खास आहे. जगभरातील महत्त्वाच्या व्यक्ती, घटना, घडमोडी, प्रसंग यांचे स्मरण करत गूगल नेहमीच डूडल साकारत असते. महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टींबाबत गूगलने डूडलच्या माध्यमातून टाकलेला प्रकाश हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय असतो.