IPL Auction 2025 Live

खुशखबर! Airtel च्या 65 रुपयाच्या प्लानमध्ये मिळणार डबल डेटा आणि 130 रुपयांचा टॉक टाइम, वाचा सविस्तर

हा प्लान एअरटेलने स्मार्ट रिचार्ज प्लान म्हणून लाँच केला होता. मात्र कंपनीने मागील वर्षी टॉक टाइम प्लान्स हटविल्यानंतर अनेक नवीन प्लान्स आणले.

Airtel (Photo Credits: File Image)

सध्या मोबाईल आणि इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता टेलिकॉम कंपन्याही बाजारात तग धरुन राहण्यासाठी नवनवीन प्लान्स आणत आहेत. यात एअरटेलने (Airtel) 65 रुपयाच्या प्लानमध्ये डबल डेटा प्लान ग्राहकांसाठी आणत आहेत. हा प्लान एअरटेलने स्मार्ट रिचार्ज प्लान म्हणून लाँच केला होता. मात्र कंपनीने मागील वर्षी टॉक टाइम प्लान्स हटविल्यानंतर अनेक नवीन प्लान्स आणले. एअरटेल इन स्मार्ट रिचार्जसोबत ग्राहकांना व्हॅलिडिटी आणि डेटा ऑफर मिळत आहे.

एअरटेलच्या या 65 रुपयाच्या प्लानविषयी बोलायचे झाले तर, यात यूजर्सना डबल टॉक टाइम ऑफर केला जात आहे. या प्लानमध्ये यूजर्सना 65 रुपयांचा टॉक टाइम मिळत होता तो आता 130 रुपये झाला आहे. 28 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये यूजर्न ना 200MB डेटादेखील दिला जात आहे. प्लानमध्ये व्हॉइस कॉल्ससाठी कंपनी 60 पैसे प्रति मिनिट दराने चार्ज करण्यात येणार आहे. जास्त कॉलिंग करणा-या ग्राहकांसाठी हा प्लान खूपच फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा- Airtel युजर्ससाठी खुशखबर, 'या' प्लॅन मध्ये मिळणार 40% अधिक डेटा

एअरटेलने रिवाइज केलेला हा प्लान सध्या देशातील काही निवडक सर्कल्समध्येच म्हणजे राज्यांमध्ये उपलब्ध केला आहे. यात आसाम, बिहार, झारखंड, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ईशान्य, ओडिशा, राजस्थान, पूर्व-पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.

दर दिवसा टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लान्स बाजारात आणत असल्यामुळे टेलिकॉम कंपन्यांत स्पर्धा खूप वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता त्यांना आपल्या प्लान्समधून जास्तीत जास्त उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी हा प्लान सुरु करण्यात आला आहे.