15 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरु होतोय धमाकेदार सेल, पाहा कोणत्या आहेत आकर्षक ऑफर्स

हा सेल 15 जुलै ते 18 जुलैपर्यंत असणार आहे

Flipkart Big Shopping Days (Photo Credits: Facebook)

ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट (Flipkart) ने भारतात बिग शॉपिग डेज सेल ची घोषणा केली आहे. हा सेल 15 जुलै ते 18 जुलैपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये घरगुती वस्तूंसह गॅजेट्सवर आकर्षक सूट मिळणार आहे. यात सेलसाठी फ्लिपकार्टने SBI सोबत भागीदारी केली असून SBI क्रेडिट कार्ड यूजर्स ला 10% अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर कंपनीने असेही सांगितले आहे की, फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला 15 जुलै ला सकाळी 8 वाजता म्हणजेच सेल सुरु व्हायच्या आधी एक्सेस मिळेल.

या सेलमध्ये टीव्ही आणि अन्य उपकरणांवर 75% ची सूट मिळणार आहे. तर फॅशन संबंधीत वस्तूंवर तसेच कपड्यांवर 80% सूट मिळणार आहे. तर ब-याच स्मार्टफोन्सवर आकर्षक सूट मिळणार आहे.

यात Nokia 5.1 Plus स्मार्टफोन 9999 रुपये, Poco F1 19,999 रुपये, Infinix Note 5 7,999 रुपये, Vivo V9 Pro 15,990 रुपयांत मिळणार आहे. Lenovo A5, Lenovo K9 आणि Infinix Hot S3X स्मार्टफोनवर देखील आकर्षक सूट मिळणार आहे. Vivo V11 Pro , Vivo V11 आणि Oppo F9 Pro वर 2000 रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट मिळेल.

तब्बल 5 रियर कॅमे-याने सुसज्ज असलेला Nokia 9 Pure View स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या या स्मार्टफोनचे जबरदस्त फिचर्स

त्याचबरोबर टॅबलेट्सवरही विशेष सूट देण्यात आली आहे. ज्यात Lenovo ECf Alcatel च्या टॅबलेट्सची किंमत 6,999 रुपयांपासून सुरु होईल. सॅमसंग गॅलेक्सी टॅब A ची विक्री 12,999 रुपयांपासून होईल. फोन्ससह कम्पलीट मोबाईल प्रोटेक्शन ग्राहकांना 99 रुपये खरेदी करु शकाल.