Flipkart कडून नागरिकांसाठी खास सुविधा ! Flight Booking वर 2500 रुपयांची मिळणार सूट

फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस ते घरातील सामानाच्या किंमतीवर सूट सुद्धा मिळते.

Representational Image (Photo Credits: Pixabay, Lars_Nissen_Photoart)

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट( Flipkart) ऑनलाईन शॉपिंगचा एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म असून तेथे विविध प्रकारचे प्रोडक्ट्स विक्री केले जातात. फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस ते घरातील सामानाच्या किंमतीवर सूट सुद्धा मिळते. परंतु तुम्हाला माहिती आहे की, फ्लिपकार्टवरुन फ्लाइट बुकिंग ही करता येऊ शकते. याच संदर्भात आज आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत.(Mobile Services in Uncovered Villages: महाराष्ट्रासह 5 राज्यातील दुर्गम गावांत उपलब्ध होणार मोबाईल सेवा; USOF योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी)

फ्लिपकार्टवर डोमेस्टिक फ्लाइट्सवर एक खास ऑफर दिली जात आहे. त्यानुसार तुम्ही भारतात कुठेही प्रवास करु शकता. त्यामुळे जर तुम्ही फ्लिपकार्टच्या माध्यमातून विमानाचे तिकिट काढल्यास तुम्हाला 2500 रुपयांची सूट मिळणार आहे. परंतु या सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला FKDOM कोडचा वापर करावा लागणार आहे. दरम्यान, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या वापरावर तुम्हाला 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळणार आहे.(Amazon Prime Video वर युजर्सला करता येणार 30 सेकंदांचा व्हिडिओ, जाणून घ्या अधिक)

जर तुम्ही फ्लिपकार्टवर पहिल्यांदाच तिकिट बुकिंग करत असाल तर 12 टक्के इंस्टंट डिस्काउंट दिला जाणार आहे. या ऑफऱमध्ये एक कमीत कमी बुकिंगच्या किंमतीची गरज नाही आहे. यामध्ये डोमॅस्टिक फ्लाइट्सवर तुम्हाला 1 हजार रुपयांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर 5 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. फ्लिपकार्ट आणि Ixigo यांच्यात पार्टरशिप आहे. त्यामुळे तुम्ही भारत आणि भारताबाहेर काही फ्लाइट्सच्या बुकिंगवर मोठी सूट मिळवू शकता.