Flipkart Dussehra Specials Sale: फ्लिपकार्ट वर दसर्‍याच्या निमित्ताने iPhone 11 Pro, Realme C3, Poco M2 सह स्मार्ट्फोन्सवर धमाकेदार ऑफर्स

Flipkart | File Photo

Flipkart Deals and Offers On Smartphones: भारतामध्ये सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. नवरात्र, दसरा, ईद, दिवाळी अशा महत्त्वाच्या सणांची आगामी काही दिवसांत रेलचेल आहे. त्यामुळे ई - कॉमर्स साईट्सवर देखील सेल, ऑफर्स यांचा पाऊस पडत आहे. फ्लिपकार्टने देखील Big Billion Days sale संपताच आता Flipkart Dussehra Specials Sale जाहीर केला आहे. या दसरा निमित्त सेलची आज (22 ऑक्टोबर) पासून सुरूवात झाली आहे. तर 28 ऑक्टोबर पर्यंत तो सुरू राहणार आहे. फ्लिपकार्टने या सेलमध्ये स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर्स जाहीर केल्या आहे. त्यात iPhone 11 Pro, Realme C3, Poco M2 यांचा समावेश आहे.

फ्लिपकार्टच्या दसरा स्पेशल सेल मध्ये नो कॉस्ट इएमआय, एक्सचेंज डिस्काऊंट, मोबाईल प्रोटेक्शन यांचा समावेश आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्टने कोटक महिंद्रा बॅंक(Kotak Mahindra Bank)आणि HSBC Bank बॅंकेच्या ग्राहकांना 10% instant discount जाहीर केले आहे. आयफोन, रेडमी च्या फोन किंमतीमध्ये मोठी सूट पहायला मिळत आहे.

iPhone 11 Pro

अ‍ॅपलचा iPhone 11 Pro हा iPhone 11 Pro फोन 79,999 रूपयांना दसरा सेलमध्ये मिळेल. यामध्ये नो कॉस्ट इएमआयचा देखील पर्याय आहे. त्यानुसर हा फोन Rs.17,767 च्या हफ्त्यापासून सुरू होईल.

iPhone SE (2020)

आयफोनच्या सीरीजमध्ये iPhone SE (2020)हा नवा आणि स्वस्त फोन अशी ओळख घेऊन आला आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 64GB model हे Rs. 34,999 ला उपलब्ध आहे. बाजारातील किंमतीपेक्षा Rs. 7,501ची सूट आहे. नो कॉस्ट इएमआय ऑफरनुसार तुम्हांला हा फोन 4,334 रूपये प्रति महिना अशा EMI ला उपलब्ध होईल.

iPhone SE 2020 128GB हा फ्लिपकार्टवर Rs. 39,999 ला उपलब्ध आहे.

Realme C3

Realme C3 हा फोन ₹ 7,999 ला फ्लिपकार्टवर आहे. आणि 4GB + 64GB model हा फोन Rs. 8,999 ला उपलब्ध आहे. Volcano Grey,Frozen Blue colour यामध्ये तो उपलब्ध आहे.

Poco M2

फ्लिपकार्टच्या दसरा स्पेशल सेलमध्ये Poco M2 हा फोन 11,499 रूपयांना उपलब्ध आहे.

या फोनचं बेस मॉडेल देखील Rs. 9,999 ला आहे.

Realme Narzo 20

Realme Narzo 20 या फोनवर देखील घसघशीत सूट आहे. 6GB + 64GB model हे Rs. 13,999 ला तर 8GB + 128GB model हे Rs. 15,999 ला उपलब्ध आहे.

सध्या फ्लिपकार्टचे प्रतिस्पर्धी असलेल्या इतर ई कॉमर्स साईट्सवर देखील धमाकेदार ऑफर्स सुरू आहेत. यामध्ये अमेझॉनचा सेल महिनाभर सुरू राहणार आहे. तर स्नॅपडील आणि फॅशनच्या इतर ई कॉमर्स साईट्सने ही सेल जाहीर केला आहे.