Flipkart Dhamaka Sale : 'या' स्मार्टफोन्सवर मिळतील धमाकेदार ऑफर्स

हा सेल 24 ते 27 ऑक्टोबरपर्यंत आहे.

फ्लिपकार्ट (File Photo)

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना अनेक ई कॉमर्स साईट्सवर सेल्सचे आयोजन करण्यात आले आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर दिवाळीचा सेल 24 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला विविध वस्तूंवर जबरदस्त डिस्काऊंट्स मिळत आहेत. फ्लिपकार्टने सुरु केलेल्या धमाका सेलमध्ये काही स्मार्टफोन्सवर कॅशबॅक आणि डिस्काऊंट ऑफर्स दिल्या जात आहेत. हा सेल 24 ते 27 ऑक्टोबरपर्यंत आहे. फ्लिपकार्टने सुुरु केला 'फेस्टीव धमाका सेल' ; 'या' वस्तूंवर मिळणार भरगोस सूट

या सेलमध्ये यावर्षी लॉन्च झालेले स्मार्टफोन्स ZenFone Max Pro (M1) आणि ZenFone 5Z वर डिस्काऊंट मिळत आहे. या स्मार्टफोन्सवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याचबरोबर अॅक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास 10% अधिक डिस्काऊंट दिले जात आहे. तर पाहुया काय आहेत ऑफर्स....

ZenFone Max Pro (M1)

ZenFone Max Pro (M1)च्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंटचा स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटचा फोनची किंमत 12,999 रुपये आहे. तसंच 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14, 999 इतकी आहे. पण या सेलअंतर्गत 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंटमध्ये 1,000 कमी झाल्याने 9,999 रुपयांना मिळेल. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटमध्ये 2,000 रुपयांची सूट मिळाल्याने हा फोन तुम्हाला 10,999 रुपयांना मिळेल. तर 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटमध्ये 2,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळाल्याने हा फोन तुम्ही 12,999 रुपयांना खरेदी करु शकता. तुम्ही हे स्मार्टफोन 3 आणि 6 महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करु शकता.

ZenFone 5Z

या स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत अनुक्रमे 29,999, 32,999 आणि 36,999 रुपये आहे. या सेलअंतर्गत या स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट मिळत आहे. डिस्काऊंटनंतर 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट असलेले फोन तुम्हाला 27,999 रुपयांना मिळेल. तर 8GB/256GB वेरिएंट असलेला फोन 31,999 रुपयांना खरेदी करु शकता.