Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टवर 23 ते 27 जूनदरम्यान चालणार महासेल; स्मार्टफोन्सवर मिळणार घसघशीत सूट, See Offers
हा सेल तब्बल 5 दिवसांचा असून तो 27 जूनपर्यंत चालेल.
कोरोना व्हायरस लॉक डाऊन (Coronavirus Lockdown) च्या काळात व्यवसाय, उद्योगधंदे सुरू करण्यास बंदी होती. यासोबतच ऑनलाईन शॉपिंग साईट्सचे (Online Shopping Sites) कामकाजही थांबले होते. मात्र आता लॉक डाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल झाल्यावर, ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म जोमात आपले काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी फ्लिपकार्टने (Flipkart) एक नवीन सेल सुरु केला होता, त्या सेलला प्रतिसाद मिळाल्यानंतर फ्लिपकार्ट आता 23 जूनपासून आपला Big Saving Days सेल सुरु करत आहेत. हा सेल तब्बल 5 दिवसांचा असून तो 27 जूनपर्यंत चालेल.
स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत असलेल्या वापरकर्त्यांसाठी हा सेल एक सुवर्णसंधी असेल. पाच दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये वापरकर्त्यांसाठी अतिशय आकर्षक ऑफरखाली बरेच स्मार्टफोन विकत घेता येऊ शकतील. या स्मार्टफोनच्या यादीमध्ये Google Pixel, Motorola, iPhone सारख्या अनेक स्मार्टफोनचा समावेश आहे. या सेलमध्ये आपण एचडीएफसी बँक (HDFC Bank) कार्डद्वारे पैसे भरल्यास किंवा ईएमआय व्यवहार केल्यास, आपल्याला त्वरित 10% सवलत मिळेल.
फ्लिपकार्ट प्लस वापरकर्त्यांसाठी हा सेल 22 जून रोजी रात्री 8 वाजता सुरू होईल. तसेच फ्लिपकार्टद्वारे नो-कॉस्ट ईएमआय पर्यायही देण्यात येणार आहे.
या आगामीसेलमध्ये 48 एमपी चा रियर कॅमेरा असणारा Vivo Z1x फोन 14,990 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत उपलब्ध असेल. या हँडसेटच्या मूळ किंमतीवर 4,000 रुपयांची सूट मिळेल. त्याचप्रमाणे Vivo Nex हा फोन 16,000 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध असेल. बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये हा फोन 23,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
फ्लॅगशिप प्रकारात, 64 जीबी स्टोरेज क्षमतेसह Apple iPhone XS फोन 58,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल, याची मूळ किंमत 89,900 रुपये आहे. दुसरीकडे Motorola Razr फोन 1,24,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोनसाठी नो-कॉस्ट ईएमआय दरमहा 5,209 रुपये पासून सुरू होईल. त्याचप्रमाणे Google Pixel 3a आणि Pixel 3a XL फोन 29,999 रुपयांमध्ये उपलब्ध असतील. हा हँडसेट दरमहा 5,000 रुपये पासून सुरू होणाऱ्या नो कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. (हेही वाचा: भारतात Tecno कंपनीचा टेकनो स्पार्क पॉवर 2 बजेट स्मार्टफोन लॉन्च; काय आहे खासियत? घ्या जाणून)
Apple iPhone 7 Plus हा 32 जीबी स्टोरेजचा फोन 34,999 रुपयांना मिळू शकेल. नो कॉस्ट ईएमआय दरमहा 5,834 रुपयांपासून सुरु. त्याचप्रमाणे iPhone 7 फोन 28,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Xiaomi Mi Mix 2 हा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजचा फोन या सेलमध्ये 14,999 रुपयांच्या सवलतीच्या किंमतीवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. Oppo A9 (2020) फोन 12,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा हँडसेट 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज पॅकद्वारे येतो.