Flipkart Big Diwali Sale : 'या' वस्तूंवर मिळत आहे 80% पर्यंत सूट

दिवाळीनिमित्त फ्लिपकार्टने हा बंपर सेल आणला आहे.

फ्लिपकार्ट photo credit : Twitter

ऑनलाईन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा सुरु केला आहे. Flipkart Big Diwali Sale असे या सेलचे नाव आहे. दिवाळीनिमित्त फ्लिपकार्टने हा बंपर सेल आणला आहे. 1 ते 5 नोव्हेंबरपर्यत हा फेस्टिव सेल असणार आहे.

या सेलअंतर्गत ग्राहकांना अनेक उत्पादनांवर भरगोस सूट मिळणार आहे. या सेलमध्ये घरगुती वस्तूंपासून अगदी स्मार्टफोनवरही 80% सूट मिळत आहे. त्याचबरोबर एक्स्चेंज ऑफर आणि अॅक्सिडेंटल वॉरंटीची सुविधाही देण्यात येणार आहे.

या सेलमध्ये मोबाईल अॅक्सेसरिज, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन, फॅशन अॅक्सेसरीज या वस्तूंवर जबरदस्त सूट मिळत आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करणार असाल तर ही संधी अजिबात दवडू नका.

काही दिवसांपूर्वी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर शॉपिंग सेल सुरु करण्यात आला होता. फ्लिपकार्टवर यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या फेस्टिव धमाका सेलमध्ये इलेक्ट्रोनिक वस्तू आणि कपड्यांवर जबरदस्त सूट देण्यात आली होती. 1 नोव्हेंबरपासून फ्लिपकार्टचा Big Diwali Sale, टीव्ही, फ्रीजवर मिळणार घसघशीत सूट