Flipkart Big Billion Days: फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज' सेल 16 ऑक्टोबर पासून सुरू; जाणून घ्या विविध वस्तूंवरील आकर्षक डिस्काउंट विषयी
प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी 'फ्लिपकार्ट'ने (Flipkart) आपल्या बहुप्रतिक्षित 'बिग बिलियन डेज'च्या (Big Billion Days) विक्री संदर्भातील माहिती ग्राहकांना दिली आहे. फ्लिपकार्टचा हा सेल 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या सहा दिवसांच्या विक्री सेल दरम्यान ग्राहकांना अनेक प्रकारच्या उत्पादनांवर खास ऑफर देण्यात येणार आहे.
Flipkart Big Billion Days: प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी 'फ्लिपकार्ट'ने (Flipkart) आपल्या बहुप्रतिक्षित 'बिग बिलियन डेज'च्या (Big Billion Days) विक्री संदर्भातील माहिती ग्राहकांना दिली आहे. फ्लिपकार्टचा हा सेल 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या सहा दिवसांच्या विक्री सेल दरम्यान ग्राहकांना अनेक प्रकारच्या उत्पादनांवर खास ऑफर देण्यात येणार आहे. त्यामुळे फ्लिपकार्टचा प्रतिस्पर्धी अॅमेझॉनदेखील पुढील काही दिवसांत आपला सेल जाहीर करू शकते. त्याचप्रमाणे स्नॅपडीलची पहिली विक्री सेल नवरात्रीच्या मधल्या दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.
फ्लिपकार्टने बिग बिलियन डे सेलसाठी अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, विराट कोहली, महेश बाबू आणि सुदीप किच्चा सारख्या स्टारसोबत पार्टनरशिप केली आहे. याबिग बिलियन डे सेलमध्ये तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास, आपल्याला 10% सूट मिळेल. (हेही वाचा -Amazon Wow Salary Days Sale: लॅपटॉप, टीव्ही, फ्रिज, एसी यांसह 'या' वस्तूंवर भरगोस सूट; पहा ऑफर्स)
दरम्यान, ई-कॉमर्स कंपन्यांची सर्वाधिक विक्री सण-उत्सवाच्या हंगामात केली जाते. ग्राहकदेखील या विक्रीची आतुरतेने वाट पाहतात. ई-कॉमर्स कंपन्या कित्येक महिन्यांपासून यासाठी तयारी करत आहेत. यावेळी कंपनीकडे मोठ्या संख्येने ऑर्डर्स येत आहेत. त्यामुळे या कंपन्या आपल्या कर्मचार्यांची संख्यादेखील वाढवतात. ई-कॉमर्स कंपन्या दसरा आणि दिवाळी दरम्यान अनेक विक्री सेल जाहीर करतात. सणाच्या हंगामात इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि होम फर्निशिंगशी संबंधित उत्पादनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होते. रेडसीअरच्या अहवालानुसार, यावेळी सणासुदीच्या हंगामात 7 अब्ज डॉलर्सची विक्री होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी ई-कॉमर्स कंपन्यांची 3.8 अरब डॉलर्सची विक्री झाली होती.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डे खास ऑफर्स -
फ्लिपकार्टने असा दावा आहे की, यावेळी कंपनीने त्याच्या प्लॅटफॉर्मवर पैसे देणे सोपं केलं आहे. फ्लिपकार्टने एसबीआयबरोबर वर्षाच्या सर्वात मोठ्या विक्रीसाठी भागीदारी केली आहे. एसबीआय कार्डद्वारे खरेदीवर तुम्हाला 10 टक्के त्वरित सूट मिळणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला पेटीएम बँक खाते व वॉलेटद्वारे निश्चित कॅशबॅक मिळू शकेल. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेसह अनेक बड्या बँकांच्या कार्डाद्वारे नो कॉस्ट ईएमआयसारख्या ऑफर उपलब्ध असणार आहेत. याशिवाय बजाज फिनजर्व कार्डवर नो कॉस्ट ईएमआयदेखील उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्टच्या मते, या सेलमुळे 70,000 हून अधिक प्रत्यक्ष आणि लाखो अप्रत्यक्ष लोकांना रोजगार मिळेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)