Flipkart Big Billion Days Sale 2020: बिग बिलियन डे सेल पूर्वीच ग्राहकांना अवघ्या एक रूपयामध्ये वस्तू Pre-Book करता येणार; इथे जाणून घ्या या धमाकेदार ऑफर्स बद्दल!
यामध्ये 16 तारखेला जरी सेल असला तरीही ग्राहकांना 11 ते14 ऑक्टोबर दरम्यान अवघ्या 1 रूपयामध्ये काही प्रोडक्ट्सची प्री-बुकिंग करता येणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या मध्यामध्ये अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या लोकप्रिय ई कॉमर्स वेबसाईट वर मोठ्या सेलची घोषणा केली आहे. दरम्यान आज फ्लिपकार्टने Big Billion Days sale event बद्दल एक घोषणा केली आहे. यामध्ये 16 तारखेला जरी सेल असला तरीही ग्राहकांना 11 ते14 ऑक्टोबर दरम्यान अवघ्या 1 रूपयामध्ये काही प्रोडक्ट्सची प्री-बुकिंग करता येणार आहे. होम, लाईफस्टाईल, ब्युटी, बेबी केअर ते अगदी इलेक्टॉनिक वस्तूंच्या लाखो वस्तू या सेलमध्ये उपलब्ध आहेत. Flipkart Big Billion Days: फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज' सेल 16 ऑक्टोबर पासून सुरू; जाणून घ्या विविध वस्तूंवरील आकर्षक डिस्काउंट विषयी.
येत्या काही दिवसांमध्ये अमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिवल' तर स्नॅपडिलचा ' कम मै दम' हा सेल देखील फ्लिपकार्टच्या सेलच्या तारखांच्या आसपास सुरू आहे. यामध्ये आता बाजी मारण्यासाठी फ्लिपकार्टने खास प्लॅन आखला आहे. यामध्ये ग्राहकांना केवळ सेलची झलक पहायला नव्हे तर अवघ्या एक रूपयामध्ये काही प्रोडक्ट्स बूक करून त्याची खरेदी करण्याची संधीदेखील मिळणार आहे. वस्तूची उरलेली रक्कम नंतर कॅश ऑन डिलेव्हरी किंवा कार्ड्स माध्यमातून ऑनलाईन देता येऊ शकते. Amazon Great Indian Festival Sale 2020: 17 ऑक्टोबरपासून सुरु होणार अॅमेझॉनचा बहुप्रतीक्षित 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल'; मिळणार अनेक सवलती व ऑफर्स.
फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डे' सेल हा 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान आहे. यामध्ये 250 मिलियन ग्राहकांसाठी विविध प्रोडक्ट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सुमारे 40-50 मिलियन शॉपर्स ऑनलाईन येणार आहेत. त्यामुळे आगामी सणा-सुदीच्या काळात मोठी उलाढाल, खरेदी होऊ शकते असा अंदाज इंडस्ट्री रिपोर्ट मधून पुढे आला आहे.
प्री-बुकिंगमुळे ग्राहकांचा नेमका कल कोणत्या वस्तू खरेदी करण्याकडे आहे. त्यांना सेल मध्ये काय हवंय? याबाबत अंदाज येऊ शकतो. आणि त्याचा फायदा शॉपर्सना होऊ शकतो. ग्राहकांना त्यांना अधिक चांगला फेस्टिव्ह जॉय देता येऊ शकतो असा विश्वास फ्लिपकार्टचे सिनियर डिरेक्टर आणि हेड मार्केटप्लेस Jagjeet Harode यांनी बोलून दाखवला आहे.
850 शहरांमध्ये आता 50,000 किराणांचा समावेश आहे. तसेच आगामी सेलच्या अनुषंगाने ऑनलाईन पेमेंटसाठी देखील ऑफर्स आहेत. यामध्ये एसबीआयने क्रेडिट, डेबिटकार्ड वर 10% सूट जाहीर केली आहे. तर फ्लिपकार्टने पेटीएमसोबतही कॅशबॅक ऑफर ठेवली आहे. Bajaj Finserv EMI कार्डचा वापर करून नो कॉस्ट इएमआय देखील काही प्रोडक्टवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.