First Triple-Fold Smartphone in The World: चीनच्या Huawei ने लॉन्च केला जगातील पहिला ट्रिपल-फोल्ड स्मार्टफोन Mate XT; जाणून घ्या फीचर्स व किंमत
तुम्ही हा फोन कपड्यांप्रमाणे फोल्ड करून ठेवू शकता. चीनची आघाडीची टेक कंपनी Huawei ने आयफोन 16 लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच मोबाइल फोन ऑनलाइन लॉन्च केला.
First Triple-Fold Smartphone in The World: एकीकडे भारतासह जगभरातील लोकांना ॲपलच्या हायटेक मोबाईल आयफोनचे वेड लागले आहे, तर दुसरीकडे चीनने अमेरिकन कंपनीला टक्कर देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अमेरिकेसह युरोप आणि भारतात बंदी असलेल्या हुवावे (Huawei) कंपनीने जगातील पहिला तीनवेळा फोल्ड होणारा (Triple-Fold Smartphone), म्हणजेच ट्रिपल फोल्ड फोन M लॉन्च केला आहे. या फोन क्रेझ आयफोनपेक्षा कमी नाही, कारण लॉन्च झाल्यापासून अवघ्या 24 तासांतच 30 लाखांहून अधिक मोबाईल बुक झाले आहेत. या फोनची किंमत आयफोनपेक्षा जास्त ठेवली गेली आहे.
चीनने आपल्या देशात अमेरिकन कंपनीला टक्कर देण्यासाठी जगातील पहिला ट्रिपल फोल्ड स्मार्टफोन लॉन्च केला आहे. तुम्ही हा फोन कपड्यांप्रमाणे फोल्ड करून ठेवू शकता. चीनची आघाडीची टेक कंपनी Huawei ने आयफोन 16 लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच मोबाइल फोन ऑनलाइन लॉन्च केला. फोन लॉन्च झाल्यानंतर कंपनीने लगेचच प्री-ऑर्डर बुकिंगही सुरू केली.
पूर्ण उघडल्यावर या फोनची स्क्रीन 10.2 इंच आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले लवचिक मटेरिअलने बनवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन एकदा फोल्ड केल्यावर 7.9 इंच (2,048 x 2,232 पिक्सेल) आणि दुसऱ्यांदा फोल्ड केल्यावर 6.4 इंच (1,008 x 2,232 पिक्सेल) आहे. यात 50-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरासह तिहेरी बाह्य कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी त्याच्या डिस्प्लेवर 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तसेच यात 16 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज दिले आहे. फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या झपाट्याने वाढणाऱ्या बाजारपेठेत या स्मार्टफोनमुळे हुवावे दक्षिण कोरियाच्या सॅमसंगला टक्कर देऊ शकते. (हेही वाचा: Apple iOS 18 Release Date: आयफोन 16 सिरीजनंतर आता समोर आली ॲपल आयओएस 18 ची रिलीज डेट; जाणून घ्या कधी व कोणत्या युजर्ससाठी होणार उपलब्ध)
या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत CNY 19,999 (अंदाजे रु 2,35,900) आहे. त्याच्या 512 जीबी आणि 1 टीबी स्टोरेज प्रकारांच्या किमती अनुक्रमे CNY 21,999 (अंदाजे रु 2,59,500) आणि CNY 23,999 (अंदाजे रु 2,83,100) आहेत. हा स्मार्टफोन रुई रेड आणि गडद काळ्या रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. येत्या 20 सप्टेंबरपासून चीनमध्ये त्याची विक्री सुरू होईल.