Photo Credit- X

Apple iOS 18 Release Date: ॲपलने (Apple) काल आपल्या वार्षिक कार्यक्रमात बहुप्रतीक्षित आयफोन 16 सिरीज सादर केली. या सिरीजमधील आयफोन 16, आयफोन 16 प्लस,  आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स असे चारही फोन भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. नवीन आयफोन्ससोबत कंपनीने आयओएस 18 (iOS 18) ची देखील घोषणा केली आहे. ॲपलची ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम येत्या 16 सप्टेंबर रोजी रिलीज होईल. त्यानंतर ॲपल वापरकर्ते त्यांच्या आयफोनमध्ये ती डाउनलोड आणि स्थापित करू शकतील. ॲपलने असेही घोषित केले आहे की, macOS Sequoia, watchOS 11 आणि visionOS 2 देखील 16 सप्टेंबर रोजी आणले जातील.

ॲपल आयफोन वापरकर्ते नवीन आयओएस 18 पूर्णपणे मोफत वापरण्यास सक्षम असतील. कंपनी आपल्या ऑपरेटिंग सिस्टमच्या नवीन आवृत्तीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. आयओएस 18 हे एक मोफत सॉफ्टवेअर अपडेट आहे, जे कंपनीच्या सर्व पात्र वापरकर्त्यांना मिळेल.

या उपकरणांमध्ये आयओएस 18 सपोर्ट उपलब्ध असेल-

iPhone XR

iPhone XS

iPhone XS Max

iPhone 11

iPhone 11 Pro

iPhone 11 Pro Max

iPhone 12

iPhone 12 Mini

iPhone 12 Pro

iPhone 12 Pro Max

iPhone 13

iPhone 13 Pro

iPhone 13 Pro Max

iPhone 14

iPhone 14 Pro

iPhone 14 Plus

iPhone 14 Pro Max

iPhone 15

iPhone 15 pro

iPhone 15 Pro Max

iPhone SE 3rd gen

iPhone SE 2nd Gen

(हेही वाचा: Apple Event 2024: अखेर आपल्या वार्षिक कार्यक्रमात ॲपलने लाँच केली iPhone 16 Series, Apple Watch Series 10, AirPods 4 सह अनेक उत्पादने; जाणून घ्या फीचर्स व किंमत)

पुगोपनीयता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आयओएस 18 पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यात आला आहे. डेटा लीक आणि फोन हॅकिंगसारख्या समस्या टाळण्यासाठी फोनमध्ये फॅक्टर ऑथेंटिकेशन असेल. यासह इतरही अनेक फीचर्स यामध्ये जोडण्यात आली आहेत. पुढील आठवड्यापासून यूजर्स त्यांचे फोन अपडेट करून नवीन फीचर्सचा अनुभव घेऊ शकतील.