FAU-G ची प्रतिक्षा अखेर संपली; पहा Android मोबाईल वर कसा कराल डाऊनलोड?
FAU-G या खेळाचा PvP [player versus player] मोड लवकरच उपलब्ध करून दिला जाणार आहे.
पबजी बंद झाल्यानंतर त्याच धर्तीवर भारतीय बनावटीचा FAU-G हा मोबाईल ऑनलाईन गेम लॉन्च होईल अशी माहिती समोर आली होती. आज अखेर 72 व्या प्रजासत्ताकदिनी हा गेम गूगल प्ले वर डाऊनलोड साठी उपलब्ध करण्यात आला आहे. दरम्यान हा गेम nCore Games कडून डिझाईन करण्यात आला आहे. PUBG Mobile ला हा पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे. सुरूवातीला nCore ने हा नोव्हेंबर 2020 मध्ये लॉन्च केला जाईल अशी माहिती दिली होती. मात्र त्याला उशिर झाला आणि आता अखेर 26 जानेवारी 2021 ला तो डाऊनलोडसाठी उपलब्ध झाला आहे.
दरम्यान डिसेंबर 2020 पासूनच त्याचं प्री-रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार या गेम साठी 4 मिलियन रजिस्ट्रेशन झाली आहेत. दरम्यान या खेळाचा PvP [player versus player] मोड लवकरच उपलब्ध करून दिला जाणार आहे.
कसा कराल डाऊनलोड FAU-G ?
- FAU-G म्हणजेच Fearless and United Guards हा गेम गूगल प्ले वर डाऊनलोडसाठी मोफत उपलब्ध आहे.
- युजर्सना प्ले स्टोअरवर जाऊन त्यांच्या अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये तो डाऊनलोड करता येईल. त्यासाठी त्यांना इंस्टॉल वर क्लिक करायचं आहे.
- Android 8 आणि पुढील सार्या स्मार्टफोन्समध्ये हा गेम चालणार आहे.
- लेव्हल अप करण्यासाठी इन अॅप परचेस चा पर्याय असण्याची शक्यता आहे.
- दरम्यान अद्याप iOS users साथी हा गेम कधी उपलब्ध होऊ शकेल याची माहिती देण्यात आलेली नाही.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने FAU-G ची घोषणा मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात केली होती. त्यामध्ये त्याने आत्मनिर्भर मोहिमेला हा गेम सहकार्य करेल असे सांगितले होते. तसेच या खेळाच्या माध्यमातून जवानांच्या हौतात्म्याबद्दल काही शिकायला मिळेल असे सांगितले होते. सोबतच त्याने 20% रेव्हेन्यू हा भारत के वीर ट्र्स्टला दिला जाईल असे देखील सांगितले होते.