तुमच्या स्मार्टफोनमध्ये Fake App आहेत? 'या' पद्धतीने तपासून पहा
त्यामधील बहुतांश अॅप हे आपल्या कामी सुद्धा येतात. परंतु यामध्ये काही फेक अॅप (Fake App) ही असून व्यक्तीगत खासगी माहिती चोरी करणे ते बँक खाते लुटण्यापर्यंतची कामे करतात.
गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) सध्या मोठ्या संख्येने मोबाईल अॅप उपलब्ध आहे. त्यामधील बहुतांश अॅप हे आपल्या कामी सुद्धा येतात. परंतु यामध्ये काही फेक अॅप (Fake App) ही असून व्यक्तीगत खासगी माहिती चोरी करणे ते बँक खाते लुटण्यापर्यंतची कामे करतात. अशातच हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, फेक मोबाईल अॅप कोणते आणि ते तुम्ही कसे तपासून पहाल. याबद्दलच आम्ही तुम्हाला महत्वपूर्ण माहिती देणार आहोत.(Cyber Crimes: 'सार्वजनिक वायफाय नेटवर्कवर बँकेचे व्यवहार करू नये'; मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सायबर गुन्ह्यांविरूद्ध केले सावध)
जेव्हा तुम्ही गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून एखादे अॅप सर्च करता त्यावेळी तेथे त्या संबंधित अन्य ऑप्शन ही दाखवले जातात. यामधील काही अॅप हे फेक असू शकतात. त्यामुळे एखादा अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची स्पेलिंग नक्कीच तपासून पहा. जर तुम्हाला स्पेलिंग किंवा आयकॉन मध्ये काही गोंधळ वाटत असेल तर डाऊनलोड करण्यापासून दूर रहा.
कोणताही अॅप डाऊनलोड किंवा इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याच्या एडिटर चॉईस आणि टॉप डेव्हलपर्सवर जरुर लक्ष द्या. या व्यतिरिक्त तुम्ही अॅपच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही त्या बद्दल अधिक माहिती मिळवू शकता. त्यामुळे फेक अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी सावध रहा.(Hike Messenger App Shuts Down! हाइक स्टिकर चॅट ॲप बंद झाल्यानंर युजर्स झाले इमोशनल, पहा व्हायरल ट्विट्स आणि मिम्स)
तसेच एखादा अॅप डाऊनलोड करायच्या आधी तो किती वेळा युजर्सकडून डाऊनलोड केलाय हे तपासून पहा. जर अधिकृत अॅप असेल तर तुम्हाला सर्वाधिक डाऊनलोडिंग केल्याचा आकडा दिसेल. पण फेक असल्यास कमी वेळा डाऊनलोड केल्याचे दिसून येईल. आणखी एक महत्वाचे म्हणजे अॅप बद्दलचा दिला गेलेला रिव्हू जरुर वाचा. खरंतर काही रिव्हू हे खोटेच असतात. पण काही रिव्हू असे सुद्धा तुम्हाला दिसतील ज्यांनी अॅप बद्दल खरी माहिती दिली आहे. त्यामुळे अॅप बद्दल निगेटिव्ह कमेंट्स अधिक असल्यास तो डाऊनलोड करु नका.