इन्स्टाग्रामसाठी फेसबुक लवकरच लॉन्च करणार नवं मेसेजिंग अ‍ॅप

त्यानंतर बदलत्या ट्रेन्डनुसार इन्स्टाग्राममध्ये विविध फिचर लॉन्च करण्यात आले.

Instagram (Photo Credits-Twitter)

फेसबुक (Facebook) कंपनीने इन्स्टाग्रामला (Instagram) विकत घेतले आहे. त्यानंतर बदलत्या ट्रेन्डनुसार इन्स्टाग्राममध्ये विविध फिचर लॉन्च करण्यात आले. मात्र लवकरच इन्स्टाग्रामसाठी फेसबुक एक नवं मेसेजिंग अॅप लॉन्च करणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सला खासगी मेसेज किंवा काही गोष्ट शेअर करु शकणार आहेत.

याबाबत फेसबुक अद्याप चाचणी करत आहे. तसेच इन्स्टाग्रामवरील क्लोज फ्रेंड या फिचरच्या मदतीने मार्क केलेल्या मित्रमैत्रीणींसोबत युजर्स नव्याने लॉन्च होणाऱ्या अ‍ॅपच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. मात्र या नव्या अॅपबाबत फेसबुक कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.(WhatsApp मध्ये लवकरच Boomerang फिचर येणार)

युजर्स सध्या स्नॅपचॅटवर जास्त वेळ वस्त असल्याचे दिसून आले. त्यामुळेच फेसबुक आता नवा अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. त्यामुळे युजर्स जास्तवेळ इन्स्टाग्रामवर वेळ घालवू शकणार आहेत.