फेसबुक आणि व्हाट्सऍप ची क्रिप्टोकरन्सी लवकरच चलनात, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्य आणि फायदे
जाणून घ्या या चलनाचे फायदे आणि वैशिष्ट्य
फेसबुक (Facebook) ने येत्या काही दिवसात ग्लोबल कॉईन (Global Coin) नामक आभासी चलन बाजारात लाँच करण्याची घोषणा केल्याचे माध्यमांच्या माहितीतून समोर येत आहे. हे ग्लोबल कॉईन एका प्रकारची क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणजेच आभासी चलन असणार आहेत. अलीकडे अनेक डिजिटल कंपन्यांनी आपापल्या खाजगी आभासी चलनाची निर्मिती केल्याचे समजत होते यात ‘लाईटकॉइन’, ‘एथेरियम’, ‘डॅश’, ‘कार्डानो’, ‘झेडकॅश’ यांसारख्या आभासी चलनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र वास्तिवकता या चलनाचा वापर अनेक सायबर क्राईम्सना आंन्तरण देऊ शकतो या भीतीने तज्ज्ञांकडून सावधानतेचा इशारे दिले जात असतात. फेसबुक निर्मित ग्लोबल कॉइन हे साधारणपणे पुढील वर्षी जगभरातील डझनभर देशांमध्ये लाँच करण्यात येतील.
ग्लोबल कॉइन हे आभासी चलन इतर कंपन्यांच्या तुलनेत विशेष असल्याचे सध्या सांगितले जातेय. ग्लोबल कॉईन्स हे फेसबूक व व्हाट्सऍप सोडून अन्य ऑनलाईन माध्यमांवर देखील वापरता येऊ शकते. याशिवाय वापरकर्त्याला बँक अकाउंट नसल्यास देखील या चलनाचा वापर करता येईल. फेसबुकच्या या निर्मितीच्या माध्यमातून डॉलर किंवा अन्य कोणतेही परदेशी चलन डिजिटल माध्यमात बदलता येऊ शकते. या डिजिटल चलनाचा वापर करून ऑनलाईन खरेदी केल्यास ग्राहकांना मोठया सवलती मिळवता येतील, तसेच व्हाट्सऍपच्या साहाय्याने पैसे ट्रान्स्फर करणे या निमित्ताने शक्य होणार आहे. India Digital Payment Report: पैसे न वापरता खर्च करण्यात मुंबईकर दुसऱ्या, पुणेकर देशात चौथ्या क्रमांकावर
दरम्यान ग्लोबल कॉइनच्या निर्मितीसाठी फेसबुकला तब्बल 1 बिलियन इतका खर्च येणार आहे त्यासाठी व्हिसा, मास्टरकार्ड यासारख्या कंपन्यांसोबत गुंतवणुकीसाठी चर्चा सुरु आहेत. अगामी काळात फेसबूक व्यतिरीक्त ‘टेलिग्रमान’, ‘सिग्नल’, ‘जे.पी. मॉरगन’, आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ या धनाड्य कंपन्या देखील चलन व्यवसायत उतण्याच्या तयारीत आहेत. मात्र, फेसबुकचे जगभरातील वापरकर्ते पाहिले तर इतर चलनांच्या तुलनेत ‘ग्लोबलकॉइन’चा वापर वाढेल अशी शक्यता तज्ज्ञाकडून वर्तवली जात आहे. मात्र, फेसबुककडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.