Facebook Data Leak: तब्बल एक लाख फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा लिक, सायबरसुरक्षा संशोधकांचा दावा- रिपोर्ट
त्यात फेसबुक वापरकर्त्यांच्या संपूर्ण डेटाचा समावेश आहे. ज्यात वापरकर्त्यांचे संपूर्ण नाव, प्रोफाइल, ईमेल आयडी, फोन नंबर आदींचा समावेश आहे.
Facebook Data Leak: फेसबुक(Facebook)च्या तब्बल एक लाख वापरकर्त्यांचा डेटा लिक (Data Leak)झाल्याची बाब समोर आली आहे. सायबरसुरक्षा संशोधकांच्या सायबरपीस टीमने हा अहवाल दिला आहे. त्यात फेसबुक वापरकर्त्यांच्या संपूर्ण डेटाचा समावेश आहे. ज्यात वापरकर्त्यांचे संपूर्ण नाव, प्रोफाइल, ईमेल आयडी, फोन नंबर आदींचा समावेश आहे. डेटा लिक प्रकरणात अद्याप गुन्हेगारांची ओळख पटलेली नाही. त्यांचा शोध सुरू(Cyber Security) आहे. (हेही वाचा:Facebook Users Data Leaked : 50 कोटींपेक्षा अधिक फेसबुक यूजर्स चा डाटा लीक, फोन क्रमांकसह इतरही माहिती सार्वजनिक )
फेसबुकने अद्याप सायबरपीसच्या दाव्यांवर भाष्य केलेले नाही. संशोधकांनी म्हटल्याप्रमाणे, 'हे उल्लंघन एखाद्या अत्याधुनिक सायबर गुन्हेगारी गटाचे आहे. हॅकटिव्हिस्टचे किंवा इतर दुर्भावनापूर्ण घटकांचे काम आहे. दरम्यान सायबर टीमकडून तपास सुरू आहे." दरम्यान, सततच्या डेटा सुरक्षिततेच्या चिंतेमुळे फेसबुक (मेटा) ला संभाव्य प्रतिष्ठेला सामोरे जावे लागत आहे. वापरकर्त्यांच्या विश्वासावर परिणाम होतो आहे.